रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट प्रकरणात डॉ. तावरे याचा सहभाग असल्याचं समोर आले

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : रुबी हॉल किडनी  रॅकेट मध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तात्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.त्याला आता या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. २०२२ साली हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तब्बल पंधरा जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रॅकेटच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०२२ मध्येच डॉ. तावरे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. समितीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता, मात्र एफआयआरमध्ये त्याचे नाव नव्हते. पोलिस आयुक्तालयात हा अहवाल नव्याने वाचण्यात आला, तेव्हा तावरेच्या विरोधातील पुरावे पुन्हा समोर आले.सध्या डॉ. अजय तावरे पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता गुन्हे शाखा किडनी रॅकेट प्रकरणासाठी तावरेचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेत आहे. लवकरच या प्रकरणात त्याच्यावर नवीन आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post