देहु, विठ्ठलवाडी येथे गॅस कट्टरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न धाडसी नागरिकामुळे दोन चोरटे पोलीसांच्या ताब्यात

 नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे अयशस्वी  तीन चोरटे कार मधुन पळुन गेले. 

प्रेस मीडिया लाईव्ह:

चंद्रशेखर पात्रे :

देहू दि :- देहु रोड च्या श्री क्षेत्र देहु है जगतप्रसिद्ध आहे लाखो भाविक येथे जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आता श्रीक्षेत्र देहु हे चोरट्यांचे क्षेत्र आहे का असे प्रश्न निर्माण झाले आहे काल काही चोरट्यांनी श्रीक्षेत्र देहूत गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला आहे. 

देहूत, विठ्ठलवाडी रस्त्यावर मध्यरात्री मंगळवारी दि.२७ रोजी दोन ते अडीच च्या दरम्यान हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरीची घटना लक्षात येताच नागरिकांनी या एटीएम चोरट्यांना धाडस करून पकडले. तर तीन चोरटे कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. देहूमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. त्यामुळे रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता देहूकर करू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देहू आळंदी रोडवर इंडसइंड बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये मंगळवारी पहाटे पाच जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले. आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला.दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान तीन आरोपी कार मधून पळून गेले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post