कोल्हापूरात कोळी जमातीच्या दोन दिवशीय महामेळाव्यास सुरुवात.

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ आयोजित दोन दिवशीय कोळी जमातीच्या कार्यशाळेस काल शनिवारी सुरुवात झाली.प्रारंभी नावनोंदणी,दिपप्रज्वलन, फोटो पूजनाने झाली. महादेव  व्हंकळी यांनी एस.बी.सी.जात प्रमाणपत्र शासनाकडे परत करणेबाबत  मार्गदर्शन केले.तालुकानिहाय जमात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे एकत्रीकरण करण्यात आले.यानंतर डॅा.मनोहर दादू कोळी यांनी जात प्रमाणपत्राबाबत कायदा-२००० व नियम- २००३ बाबतच्या तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महादेव कोळी- कोळी महादेव जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबत करावयाची उपाययोजनानंतरची अपीलपद्धती न न्यायालयीन मार्गक्रमनाबाबतचे मार्गदर्शन विनायक कोळी म्हैशाळकर यांनी केले.यानंतर शंकासमाधान व प्रश्नोत्तरे घेण्यात आले.

 रविवार दि.१७ मे २०२५ रोजी कोळी महादेव जात प्रमाणपत्र मिळविण्याबाबत उपविभागीय  अधिकारी स्तरावर करावयाची उपाययोजना व अपिलांबाबतची कार्यपद्धती व अपिलांबाबतची कार्यपद्धती- प्रा.बसवंत पाटील जात वैधता प्रमाणपत्राबाबत कार्यपद्धती व तयारी बाबतचे मार्गदर्शन डॅा.मनोहर दादू कोळी करणार आहेत.

कोळी नोंदींवरून कोणते जात प्रमाणपत्र मिळवता येईल? व कसे? याबाबत मार्गदर्शन महादेव व्हंकळी करणार आहेत.कोळी नोंदींवरून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होऊ शकेल काय? याबाबत कायदेशीर मार्गदर्शन विनायक कोळी यांचे होईल.इयत्ता १०वी, १२वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जमात बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त जमात बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post