प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड :प्रतिनिधी :
मराठी वि.मं.आलास शाळेचे हरहुन्नरी अध्यापक दिपक विटेकरी यांची कन्या कु.प्रणया हिने इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९३ % गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले.ब्रिलियंट स्कूल शिरोळ मध्ये पाचवा क्रमांक मिळविलेबद्दल तिचा विविध मान्यवरांच्या कडून सत्कार करून पुढील शिक्षणाला शुभेच्छा देण्यात आल्या.तिला ब्रिलियंट स्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले.तर वडील दिपक,आई शोभा व कुटुंबियांचे प्रोत्साहन लाभले.
सत्काराप्रसंगी अल्लाबक्ष नदाफ, मेहबूब मुजावर,अशोक कोळी,विनोद माने,रियाज बाणदार,सुनिल कोळी, दिलीप शिरढोणे व विटेकरी कुटुंबिय उपस्थित होते.
Tags
दत्तवाड