अनुस्कुरा घाटातील पथमार्ग शिलालेखाचे संवर्धन,उगवाई मंदिर जीर्णोध्दार. कोळी जमात व चौकेवाडी ग्रामस्थांची मागणी

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड:प्रतिनिधी :

चौकेवाडी(अनुस्कुरा) ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर येथील पुरातन असणारे उगवाई देवी मंदिर कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र शासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांनी मंदिराचा जीर्णोधार करण्याची मागणी चौकेवाडी ग्रामस्थ,उगवाई देवी प्रतिष्ठान यांनी केली आहे.




   उगवाई देवीच्या मंदिर परिसरात १७ व्या शतकातील पथमार्ग शिलालेख आढळून आलेला आहे.हा इतिहास अभ्यासासाठी महत्वपूर्ण असे लिखित साधन आहे. त्याच्यामुळे १७ व्या शतकाच्या पूर्वीपासूनच सह्याद्री घाटमाथ्यावर कोळी महादेव जमातीचे लोक तुर्की व इतर परकीय सत्तांच्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी अस्तिवात असणाऱ्या दलाचे नेतृत्व करीत होते. अशा या महत्वपूर्ण शिलालेखाचे रक्षण व संवर्धन करण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी जमात,उगवाई देवी मंदिर प्रतिष्ठान व चौकेवाडी ग्रामस्थांतून होत आहे.

        शिलालेखाचे संशोधक व वाचक अनिल किसन दुधाणे,कोळी जमातीचे अभ्यासक डॉ.मनोहर कोळी,सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाचे सचिव रमेश शंकर कोळी, दिलीप शिरढोणे,श्रीधर कोळी,शिवाजी कोळी,मारुती बापू कोळी यांच्यासह जमात बांधव,उगवाई देवी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व चौकेवाडी ग्रामस्थांनी मंदिर परिसर व शिलालेखाची पाहणी केली.ऐतिहासिक शिलालेख शोधल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान ग्रामस्थांनी केली.

           याबाबतची अधिक माहिती अशी की कोळी सदाशिव याने वन्य प्रदेशात म्हणजे जंगलात चोरवाटा असणाच्या दुर्गम प्रदेशाचा वापर करुन तिथे युद्ध प्रशिक्षण देवून शत्रूपासून बचाव करणाऱ्या लोकांच दल म्हणजे वीरांची फौज निर्माण करून वीरांचा वंश घडवला,तयार केला जर शत्रूचा (तुर्क सरदारांचा) जथ्था, कळप किंवा फौज या वाटेवर शिरली तर त्यांच्यासाठी ही वाट किंवा ठिकाण हे वज्रदंडाच्या प्रहारासारखी आहे.


शिलालेखाचे महत्व : लेखात आलेला कालो (कोळी) सदाशिव हा कदाचित महादेव कोळी समाजाचा व्यक्ती असावा ? कोळी वीरांना याने प्रशिक्षण दिलं आणि त्याने हा दुर्गम प्रदेश त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरला आणि तिथे युद्ध प्रशिक्षणाचा उपयोग करून शत्रूपासून बचाव करणा‌ऱ्या लोकांचे दल निर्माण करून वीरांचा वंश तयार केला. तात्पुरती वस्तीस्थान,पहाऱ्याची जागा, लपून बसण्याच्या तसेच शस्त्र,सामान दडवण्याच्या जागा आसपास तयार केल्या. जर या वाटेवर शत्रू आला तर त्यावर इंद्राच्या शस्त्रा सारखे वज्रप्रहार त्यावर पडेल.आक्रमण होईल त्यात त्याचा पराभव होईल.वज्रदंड,यमदंड वगैरे शब्द आपल्या चालुक्य,यादव वगैरेंच्या लेखांत बिरुदांत वापरलेले नेहमी आढळतात.सदर लेख एका जंगलातील घाटमाथ्यावरील वाटेवर आहे.शिलालेखाच्या ठिकाणी एका वीराचे वज्र प्रहार करतानाचे शिल्प आहे.शिवाय लेखात देघिन हा तुर्की शब्द आहे.देघिन म्हणजे तुर्की फौजा असा अर्थ होतो.पूर्वी निजामशाहीत, मोगलशाही,तसेच शिवकाळात किल्ल्याच्या घेऱ्यात महादेव कोळी समाज कार्यरत होता.यावरून हा शिलालेख त्या काळातील तत्कालीन भौगोलिक परिस्थिती,राज्यकर्त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे तसेच घाट माथ्यावरील संरक्षण व्यवस्थेचे महत्व स्पष्ट करतो हे या लेखाचे विशेष महत्व आहे.

जी.पी.एस. : N-१६.७६२७०६,W-७३.७९१४९

शिलालेखाचे स्थान : अनुस्कुरा घाट जेथून चालू होतो तेथील उगबाई देवी मंदिराच्या परिसरात वाटेवर मोकळ्या दगडावर कोरलेला आहे.

अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे.भाषा: देवनागरी लिपीतील अशुद्ध मराठी भाषेत आहे.प्रयोजन : शत्रूवर नजर ठेवण्यासाठी वीरांच्या वंशाची फौज तयार केल्याची स्मृती जपणे.

मिती / वर्ष :-काळ वर्ष : सतरावे शतक अक्षर वळणावरून समजते.

कारकीर्द :- मराठा कालखंड व्यक्तिनामः कोळी महादेव आहे.

संक्षेप :- कालो- कोळी,प्रदेसि-प्रदेश, बनी-जंगल,घडोवु घडविला,डेधिन तुर्क कलप-कळप,सत्रु-शत्रू

शिलालेखाचे वाचक: श्री.अनिल किसन दुधाणे,श्री अथर्व पिंगळे.


अनुकुरा घाट :

१. अनुस्कुरा घाटाचा इतिहास तसा हा खूप जुना आणि व्यापार मातील एक महत्त्वाचा भाग आहे.सुमारे२००० वर्षापूर्वी पासून सातवाहन काळात चालू असलेल्या हा घाट नावारूपाला येतो. या घाटामध्ये सापडलेली सातवाहन काळातील नाणी यामुळे पुन्हा नावारूपाला हा मार्ग आला. व्यापारासाठी सोयीचे व्हावे, यासाठी देश व कोकणाला जोडत हा घाट मार्ग सातवाहन काळात करण्यात आला.सुमारे २००० वर्षापूर्वीचा हा पक्का फरसबंदी मार्ग आहे.अरबी समुद्राच्या किना-यावरील राजापूर हे जुने बंदर आहे.या बंदरावरून ये जा करणाऱ्याला घाटावरचा दक्षिण सह्याद्री मधला प्राचीन मार्ग म्हणजे अनुस्कुरा घाट.

२. शिलाहार राजा भोज यांनी घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी विशाळगड बांधला.आंबा घाटमाळ्याच्या दक्षिणेस २० कि. मी.अंतरावर प्रसिद्ध विशाळगड किल्ला आहे.विशाळगड किल्ल्याच्या उत्तरेस रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडा आणि दक्षिणेस लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली अशा वाटा होत्या गजापूर गावाजवळ एकत्र येतात. त्या ठिकाणी गजापूर खिंड या नावाची एक निमुळती खिंड आहे. देवता आणि प्रभानवल्ली वाटांच्या सुमारे १८ कि. मी.दक्षिणेस अनुस्कुरा घाट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरहून येणारा शाहूवाडी तालुक्यातील सध्याचा राजापूर मलकापूर मार्ग याच घाटातून जातो.

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात १६५९ साली पन्हाळा बरोबर विशाळगड ही जिंकला. त्यामुळे संपूर्ण घाटमाथा हा शिवरायांच्या ताब्यात आले होते, महाराज पन्हाळ्यावर असताना वेढ्यात अडकले होते त्यावेळी इंग्रजांनी लांब पल्याच्या तोफा राजापुरातून पन्हाळ्यास पाठवल्याचे पाहायला मिळतात. महाराज वेढ्यातून सुखरूप विशाळगड येथे पोहोचले. त्यावेळी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी राजापूर बंदर जिंकले.कोकणातील बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. शिव काळात कोकणातील बंदरात माल उतरला की तो घाटावर पोचवला जायचा. मालानुसार कर आकारणी केली जायची. करवसुली, माल तपासणीसाठी घाटाच्या तोंडाशी चौकी होती. म्हणून येथील वस्तीला चौकेवाडी नाव पडले.

सदर शिलालेख माहिती व संशोधन कार्यात प्रतिक पाटील तसेच दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post