प्रेस मीडिया लाईव्ह :
युनुस लाडखान :
हेरवाड : होळकर युवा ग्रुप,धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती हेरवाड ता.शिरोळ येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.
देशासाठी आणि धर्मासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्या कर्मयोगी, जगतमान्य,आदर्श रणरागिनी, अटकेपार झेंडा रोवणारी,मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श घेण्यासारखा आहे.त्यांच्या विचाराला उजाळा प्राप्त होण्यासाठी दरवर्षी मोठया उत्साहात जयंती साजरी केली जाते.
यंदा३०० व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य धनगरी ढोल वादन,मराठी धनगरी ओव्यांचा कार्यक्रम,रेकॉर्ड डान्स स्पर्धा,हातात बैल धरून पळविणे,होम मिनिस्टर,गुणवंत विद्यार्थी सत्कार, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयंती सोहळ्यास भेट देवून शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते.त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.हेरवाडात प्रथमच मिरवणूकीत केरळी वाद्यांचा समावेश करण्यात आलेला होता.तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.याच बरोबर पेपर ब्लास्ट,आकर्षक लाईटस चा समावेश होता.