प्रेस मीडिया लाईव्ह :
लातूर जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, माजी आमदार आरटी देशमुख यांचे निधन झाले. पावसामुळे गाडी स्लिप होऊन ही भीषण दुर्घटना घडली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलावरुन जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली. या घटनेत गाडीतील वाहनचालक सुदैवाने बचावला आहे, त्याच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे. महामार्गावर साचलेले पाणी उडून काचेवर आल्यामुळे चालकास काही दिसले नाही. त्यामुळे, चालकाने वेगात ब्रेक लावले, तेव्हा गाडी जागेवरच स्लिप झाली.चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीने चार पलट्या खाल्ल्या, त्यात माजी आमदार आरटी देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी 2014 मध्ये माजलगाव मतदारसंघातून निवडणूकलढवल होती.देशमुख यांना गंभीर, जखमी अवस्थेत लातूरला नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं, पण तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
माजी आमदार आरटी देशमुख हे वाहनचालकाच्या बाजुला पुढील सीटवरच बसले होते, अपघातानंतर तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पण, त्यांनी घटनास्थळावरच जीवा सोडला होता.आर.टी. जिजा देशमुख हे परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. 2014 साली त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती.दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते.जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली आहे.