काळाने पत्रकार क्षेत्रातील एक चांगला पत्रकार हिरावला



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

धुळे.... दिनांक.. ५ ऑगस्ट २०२१.. रोजी मुंबई येथून काम आटोपून प्रवास करत आपल्या मातृभूमी असलेल्या धुळे शहरात विनोद पठाण हे धुळ्यात परत आले. आणि रात्री साधारण आठ वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून दवाखान्यापर्यंत इलाज घेण्यासाठी गेले असता त्यांना हृदयविकाराचे तीव्र झटके आल्याचे सांगण्यात आले. त्यातच त्यांची रात्री नऊ वाजता प्राणज्योत हृदय विकाराच्या झटक्याने मालवली. एक चांगला हुन्नरी, पत्रकार व एक सामाजिक जाण असलेला प्रचंड मदत करण्याची इच्छाशक्ती असलेला विनोद अंधार करून गेला....... हा सर्व पत्रकार क्षेत्रातील मित्र व सामाजिक कार्यातील सामाजिक कार्यकर्ते यांना मोठा धक्का बसलेला आहे. कधी न सावरले जाणारे हे दुःख विनोद पठाण यांच्या परिवारासह मित्र परिवार व गोतावळा मध्ये आलेले आहे. विनोद पठाण म्हणजे एक स्मित हास्य असणारा, चेहऱ्यावर एक निरागस असे भाव असलेला, कुणालाही सहज मदतीला धावून येणारा, जात पात पंथ या भिंतीपलीकडे सतत सर्व समाजाविषयी आदर करणारा व प्रत्येक समाजातील मित्रांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करणारा व्यक्तिमत्त्व हरपल्याने प्रचंड वेदना झालेल्या आहेत... अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये विनोद पठाण यांनी वासवा टायर धुळे येथे उत्कृष्ट व्हील बॅलेंसिंग करणारा कारागीर म्हणून त्यांची ख्याती होती. याच व्यवसायातून अनेक बडे अधिकारी, राजकीय पुढारी, विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यावेळी त्यांची फोरविलर कार वासवा टायर धुळे येथे व्हील बॅलेंसिंग करण्यासाठी जात असत तेव्हा आवर्जून विनोद पठाण यांनीच आपले काम करावे असा प्रचंड विश्वास पात्र असलेला उत्तम कारागीर यातून त्यांनी मोठा मित्रपरिवार गोळा केला होता. पुढे पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले आणि साप्ताहिक व न्यूज चैनल मध्ये देखील काम केले. पत्रकारांसाठी आपण काहीतरी करावे यासाठी लोकांचा विचार मनात आणून सामाजिक भान लक्षात घेता लोकहित पत्रकार संघ या नावाची संघटना स्थापन केली. यातून विविध पत्रकारांसाठी बैठका सुरू झाल्या. उपक्रम सुरू केले. सामाजिक व्यवस्थेमध्ये चांगले कार्य करणाऱ्यांना ऑफिस किंवा घरी जाऊन अशा व्यक्तींचा सन्मान पत्र देऊन सन्मान देखील ते करून आलेत. पोलीस दलातील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांचे मित्राचे नाते होते. विविध आरोग्य विभागात उत्तम कार्य करणारे डॉक्टर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आता गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच धुळे येथील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ व भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय डॉक्टर माधुरीताई बोरसे यांचा सन्मान ते प्रत्यक्ष निरामय हॉस्पिटल येथे जाऊन करून आले होते. दिल्ली लोकसभा असो की मुंबई विधान भवन येथे पोचण्यासाठी धडपड करणारा विनोद म्हणजे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख मोठ्या मोठ्या मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून सामाजिक काम करून आणण्याची धमक त्यांच्यात होती.लोकहित पत्रकार संघाच्या माध्यमातून एक चांगली चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. त्यांना एक लहान मुलगी आहे त्या मुलीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. कधीकधी ते सोबत तिला घेऊन देखील सामाजिक कार्य करताना दिसून आलेले आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता समाजासाठी काहीतरी करावे अशी वारंवार धडपड करणारा विनोद पठाण हे जेव्हा लोकहित पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जनते समोर जात असत नक्कीच त्यांनी चांगलाच आशीर्वाद मिळवला आहे. ज्या ग्रामीण भागातील पत्रकारांना इतर पत्रकार संघामध्ये स्थान मिळत नव्हते शहरी भागातील काही पत्रकारांना देखील त्यांनी लोकहीत पत्रकार संघाचे व्यासपीठ उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीने सर्वधर्म सम भावातील पत्रकार संघ चालवलेला आहे. साप्ताहिक पोलीस व्हिजन मधून देखील त्यांनी पत्रकारिता केलेली होती. लोकहीत पत्रकार संघावर पोलीस व्हिजन चे मुख्य संपादक म्हणून माझी त्यांनी प्रदेश सचिव म्हणून निवड केलेली होती. कोणतेही कार्य असो आधी माझा सल्ला ते विचारत असत. वेळोवेळी त्यांना समाजात सामान्य माणसांसाठीच कार्य करायचे असा सल्ला त्यांना दिला होता. त्याप्रमाणे ते केव्हाही मदत करण्यासाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून समाजापुढे उठली राहिले.एक सच्चा मित्र आम्हा सर्व मित्रांना सोडून देवलोकी गेल्याने प्रचंड दुःख झालेले आहे. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात तेवत राहणार आहे. परमेश्वर, अल्लाह त्यांच्या मृतात्म्यास सुख शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आमचा हुन्नरी व प्रामाणिक मित्र विनोद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो... भावपूर्ण श्रद्धांजली!!!* 

प्रल्हाद साळुंके, मुख्य संपादक सा.पोलीस व्हिजन, धुळे.

Post a Comment

Previous Post Next Post