बळीराजा शेतकरी शेतमजुर संघटनेच्या वतीने जॉबकार्डचे वितरण




तारदाळ प्रतिनिधि श्रीकांत कांबळे 

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे बळीराजा कृषि विज्ञान मंडळ कार्यरत असुन तर्फे बळीराजा शेतकरी शेतमजुर संघटनेच्या मंडळामार्फत शेतकरी शेतमजुर व असंघटीत कामगाराना शासनाचे लाभ मिळवुन देण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असते त्यातुनच गेली कित्येक महिणे बळीराजा शेतकरी शेतमजुर संघटनेने  पाठपुरावा केल्यामुळे बारा लाेकांना जॉबकार्ड मिळाले असुन त्याचे वितरण बळीराजा मंडळाचे व बळीराजा शेतकरी शेतमजुर संघटनेचे पदाधिकारी व मान्यवराच्या उपस्थितित वाटप करण्यात आले यावेळी बळीराजा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब महाजन,बळीराजा शेतकरी शेतमजुर संघटनेचे अध्यक्ष इस्माईल मुजावर, सेक्रटरी रविद्र कांबळे,माजी डेप्युटी सरपंच चंद्रकांत तांबवे, ग्रामपंचायत सदस्य  मृत्युंजय पाटील, भिमराव बन्ने,ज्याेतीराम काेळी, भाऊसाे वास्के,पापा मुजावर,रावसाहेब डपाले, व संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थिति हाेते.

Post a Comment

Previous Post Next Post