प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ :प्रतिनिधी :
शिरोळ भूषण"पुरस्कार जाहीर झाले पासून शिरोळ च्या कर्तबगार गट शिक्षण अधिकारी सौ.भारती सुनिल कोळी यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विविध शिक्षक संघटना, पदाधिकारी,मान्यवर व्यक्ती व शिक्षक शुभेच्छा देत आहेत.एका कर्तबगार व सर्वांना सोबत घेवून जाण्याच्या वृत्तीमुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शिरोळ तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले उपक्रम,त्याची फलश्रृती यांमुळे शिरोळ तालुक्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
बुधवारी पंचायत समिती शिरोळ येथे अल्लाबक्ष नदाफ,सौ.अश्विनी कुमार कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,मेहबूब मुजावर,अशोक कोळी, दिपक विटेकरी,रियाज बाणदार, सुनिल कोळी,इरफान पटेल,विनोद माने,संगीता यादव,वैशाली लाटवडे,शंकर बरगाले, महेश सावळीकर,विश्वनाथ जाधव व दिलीप शिरढोणे यांच्याकडून शुभेच्छा देवून कार्याचा गौरव करण्यात आला.