राज्यातील सुरक्षारक्षकांना खाकी गणवेश व साहित्यसह नियमांचे पाळण्याचे आदेश जारी. -

 जारी केलेल्या नियम व अटी पाळणे आवश्यक नाहीतर योजनेतील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई.         

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

   पुणे दि. :- महाराष्ट्रातील राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाचे गणवेशाचे अनावरण कामगार मंत्री ॶॅड . फुंडकर यांच्या हस्ते १ मे कामगार दिवस रोजी करण्यात आले. या खाकी वर्दी साठी अनेक वर्षांपासून १६ जिल्ह्यातील अनेक सुरक्षा रक्षक व विविध संघटना यांनी खाकी वर्दी करण्यात यावी यासाठी झटत होते आणि या गोष्टीला सुरक्षारक्षकांना व संघटनाना यश प्राप्त झाले आहे आणि १ मे २०२५ पासून याची अंमलबजावणी ही झाली आहे. 

आता या खाकी वर्दी बाबत महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जारी केले आहेत मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना गणवेश बदलल्या बाबत जिल्ह्यातील मा. सह आयुक्त कामगार यांना व नोंदीत आस्थापना यांना परिपत्रक जारी केले आहेत तर काही नियमावलीचे पालन करण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना दिले आहेत सुरक्षा रक्षक (पुरुष व महिला) यांना    (१) खाकी रंगाचे गणवेश (पॅन्ट व शर्ट) चिन्ह (लोगो)सहित (२) निळ्या रंगाची टोपी लोगो सहित (३) काळ्या रंगाचा पट्टा (४) खाकी रंगाचे सॉक्स, (५) काळे रंगाचे बूट, (६) शोल्डर बॅच, (७) निळ्या रंगाची दोरी (८) निळ्या रंगाची सिंगल फित नेम प्लेट तर मुख्य सुरक्षारक्षकांना वरील प्रमाणेच गणवेश साहित्य दिले आहेत त्यात निळ्या रंगाची फितचे समाविष्ट आहे तर सुरक्षा पर्यवेक्षक यांना कॅप बॅच व निळ्या रंगाची दोन फित तर सहायक सुरक्षा रक्षकांना निळ्या रंगाची पी कॅप लोगो सहित खांद्यावर १स्टार बॅच सुरक्षा अधिकारी यांना निळ्या रंगाची टोपी लोगोसहित खांद्यावर २ स्टार बॅच, तर मुख्य सुरक्षा अधिकारी यांना खांद्यावर ३स्टार बॅच असे गणवेशासहित साहित्यसह गणवेश परिधान करणे आवश्यक                                

सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी पाळण्याचे नियम व बंधन                  

(१) मंडळांनी विविध स्थापनेत वितरित केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्यवर पदनिहाय संपूर्ण गणवेश यामध्ये हजर असणे बंधनकारक आहे (२) सदर गणवेश हा स्वच्छ धुतलेला तसेच इस्त्री केलेला व नीटनेटका असावा (३) सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्य कालावधी संपल्यानंतर मंडळाचा गणवेश परिधान करू नये कर्तव्य संपल्यानंतर सार्वजनिक व खाजगी ठिकाणी मंडळाचा गणवेशाचा वापर केल्याचे आढळल्यास सदर सुरक्षा रक्षक शिस्तभंगाचा कारवाईस पात्र असेल (४) कर्तव्यवर असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे नागरी विषयांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर राहणे सर्वस्वी चुकीचे असून शिस्तभंगाचा कारवाईस पात्र असेल, (५) सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पदाप्रमाणे फित व स्टार लावणे बंधनकारक आहे, (६) सर्व सुरक्षा कर्मचारी यांनी स्वच्छ दाढी व केस बारीक असणे आवश्यक आहे, (७) सर्व महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केसाच्या अंबाडा बांधलेला असावा व त्यावर काळी जाळी घालणे बंधनकारक आहे केस मोकळे सोडलेले नसावेत,(८) सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बूट स्वच्छ व पाॅलीश केलेले असावे, (९) कर्तव्यावर हजर असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गणवेशावर नेमप्लेट लावणे बंधनकारक आहे, (१०) कर्तव्यवर हजर असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मंडळाचे ओळखपत्र गळ्यात घालावे,(११) गणवेश धारी सुरक्षा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर वागणूक सौजन्याची व जवाबदाऱ्याची असावी सुरक्षा कर्मचारी कोणते उद्धट व आश्र्लाघ्य (लाजिरवाणी) वर्तन अथवा गैरवर्तन करणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी (१२) आपण परिधान केलेल्या गणवेशाचा सभ्यतेने व मान राखून कर्तव्य करावे, (१३) उपरोक्त नियमावलीचे सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भंग केल्यास त्यावर योजनेतील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच इतर लागू असलेल्या कायद्यानुसार कार्यवाहीस पात्र राहतील असे परिपत्रक जारी केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post