प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे ; काल झालेल्या अवकाळी पावसाने पुणे शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने पुण्याचा विकास पावसाने वाहून गेला शहरातील अनेक भागांत पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली.रस्ते आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.घरं आणि गाड्या पूर्णपणे पाण्यात अडकल्या.
महापालिकेच्या गटारसफाई कामाचा अक्षरशा फज्जा उडाला आहे.नाले व गटारांतील कचरा वेळेत न काढल्याने पाणी रस्त्यावरून वाहू लागले .महापालिकेने गटार स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले तरी देखील चेंबर तुंबल्याने पाणी गटारात न जाता रस्त्यावरून वाहिले..
पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेची व्यवस्था अपुरी ठरली प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तारेवरची कसरत करत होती पावसामुळे कामकाजाची अंमलबजावणी करताना प्रशासन गोंधळले दिसत होते.