लक्ष्मीनारायण टॉवर मधील नागरिक भयभीत आयुक्तांकडे शिवसेनेची तक्रार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- आंबील ओढ्याकाठी असणाऱ्या लक्ष्मीनारायण टॉवर मधील नागरिक आंबील ओढ्याच्या मागील अनुभवातून भयभीत झाले असून सोसायटी सीमा भिंत तुटण्याच्या स्थितीत आहे, त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच राडा रोडा, घाण आजही नाल्यातच असल्याने आंबील ओढा नाले सफाई फक्त कागदावर असल्याची लेखी तक्रार शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे अनंत घरत यांनी पुणे मनपा आयुक्तांकडे केली आहे आणि तत्पर सदर विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे .
२०१९ ची आंबिल ओढा दुर्घटना आठवण आजही पुणेकरांच्या काळजाचा थरकाप उडविते. पण अजूनही प्रशासन काही जागे झालेले दिसत नाही कारण कालच्या पावसामुळे पुणे मनपा प्रशासनाचे अपयश समोर आले आहे, पुण्यात रस्त्यांनी अक्षरशः नद्यांचे नाल्यांचे रूप घेतले होते, अनेक जागी लोकांच्या टू व्हीलर ही वाहून गेल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या.
सन २०१९ मधे आंबील ओढ्याने रुद्र रूप घेतले होते आणि त्यामध्ये वित्तहानी सोबत जीवित हानी ही झाली होती अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यावेळी आंबील ओढ्या काठी असणारी निलयम थिएटर मागील स्नेह नगर मधील लक्ष्मी नारायण टॉवर सोसायटी चे ही लाखोंचे नुकसान झाले होते, अनेक रहिवाश्यांच्या कार, बाईक वाहून गेल्या होत्या, ओढ्याच्या पाण्याने सोसायटी ची सीमाभिंत तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि सोसायटी मधील नागरिकांची हालत खराब झाली होती. तीच घटना पुन्हा एकदा घडणार आहे कारण अजूनही आंबील ओढ्यातील राडा रोडा, घाण तशीच आहे ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट आहे, सोसायटी सीमा भिंत तुटण्याच्या अवस्थेत आहे , ठेकेदार दिवस भरायची कामे करीत आहे आणि प्रशासन बिले काढायची काम करीत आहेत असे दिसते, पुण्याच्या खासदारांनी आंबील ओढा तसेच पुण्यातील नाल्यांच्या सीमाभिंती साठी २०० कोटी आणल्याचे बॅनर लोकसभेपूर्वी निवडणुकीत जाहीर लावले होते, पण आजची परिस्थिती पाहता पुणे मनपा ला राज्य सरकार कडून तो निधी मिळालाच नाही त्यामुळे सीमाभिंतीच्या सर्व निवेदिता रद्द करण्यात आल्या होत्या, ही पुणेकरांची भाजप ने फसवणूक केली आहे असे शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत म्हणाले.
सोसायटी तील नागरिकांनी प्रशासनाशी बोलायचं प्रयत्न केला आहे पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न त्यांनी मांडला असून पुणे महानगर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले साहेबांनी स्वतः स्थळ पाहणी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
अनंत रामचंद्र घरत
शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे.
# ९९२२९२७९५९