प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल संध्याकाळी उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. मिळकत कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदी अविनाश सपकाळ यांची तर सामान्य प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या उपायुक्त पदी प्रसाद काटकर यांची नियुक्ती केली आहे .सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तसेच कर आकारणी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रतिभा पाटील यांना दक्षता ,मालमत्ता व व्यवस्थापन तसेच भूसंपादन व व्यवस्थापन विभाग प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. तर उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना, मुद्रणालय तसेच परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे क्रीडा विभाग मध्यवर्ती भांडार विभाग सोबतच परिमंडळ दोन ची जबाबदारी देण्यात आली आहे.
अतिक्रमण तसेच मिळकतकर विभागातील प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली . त्यांच्याकडील मिळकतकर विभागाचा पदभार काढून उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला मिळकत कर विभाग मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे .या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होईल अशी चर्चा होती .परंतु आज महापालिका आयुक्त यांनी महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवत पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सपकाळ यांच्याकडे महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राच्या संपादनाचेही काम आहे. त्यांनी यापूर्वी परिमंडळ गवणी या ठिकाणी काम केले आहे.
शासन शासन सेवेतील प्रसाद काटकर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग तसेच निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटकर यांच्या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे.