देहूरोड येथे सर्व पक्षीय आढावा बैठक, मी सामिल होणार तुम्ही पण बहुसंख्येने सामिल होण्याचे आवाहन
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. :- पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच ऑपरेशन सिंदुर च्या माध्यमातून भारताचे जवानांनी पाकिस्तानला धडा शिकवत पाकिस्तानच्या ९ ठिकाणी तसेच एअरबेस उडवुन पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्या प्रकरणी आणी जवानांनी दाखविलेल्या शौर्य बदल हॅश टॅग तिरंगा यात्राचे आयोजन नियोजनाची माहीती आज देहूरोड वैश्य समाज मंदिर येथे सर्व पक्षीय आढावा बैठक घेत पत्रकार परिषदेत माहीती देण्यात आले .
सर्व प्रथम नेहरू मंगल कार्याल्याचे पटांगणात ऑपरेशन सिंदुर च्या नावाने चारचाकी वाहन वर ऑपरेशन सिंदुर ने सजविलेल्या वाहन वरती देशाचे सैनिकांचे शौर्य चित्र कोरलेले वाहनावर कर्नल सोफीया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे भव्य चित्र काढलेल्या वाहना समोर जोरदार घोषणा देत पत्रकार परिषद सुरूवात करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांनी माहीती देताना सांगितले की येत्या वीस तारखेला दुपारी तीन वाजता देहुगांवच्या जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिर येथुन या रॅलीची सुरूवात होणार आहे ही रॅली देहुगांव पासुन निघुन देहूरोड येथील अबुशेठ रोड वृंदावन चौक भाजी मंडई सुभाष चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथुन ही रॅली मावळच्या दिशेने निघणार व सांगता वडगाव मावळ येथील पोटोबा मंदिर या ठिकाणी सांगता होईल ठिक ठिकाणी या रॅली चे स्वागत करण्यात येणार आहे या रॅली मध्ये सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष व इतर सर्व जाति धर्माचे लोक सामिल होऊन आपल्या जवानांना पाठबळ देण्यासाठी सर्वानी एकजुटीने देशा करीता या रॅली मध्ये बहुसंख्येने सामिल होण्याचे आवाहन केले. वैश्य समाज मंदिर येथे हॅश टॅग तिरंगा यात्राचे आयोजन नियोजन बाबत सर्व पक्षीय आढावा बैठक घेत भाजपा शहराध्यक्ष देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक रघुवीर शैलार यांनी ऑपरेशन सिंदुर च्या हॅश टॅग तिरंगा यात्रेची माहीत देताना सांगितले. आपले भारतीय सैनिकांनी पराक्रम दाखवत अख्या जगासमोर भारतीय जवान काय आहे हे दाखवून दिले आहे पाकिस्तान मध्ये अतिरेक्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करत १०० पेक्षा जास्त अतिरिक्यानचे खात्मा आपले जवानाने केले व पाकिस्तान मध्ये घुसुन पाकिस्तानच्या एअरबेस उडवुन देत पाकिस्तानला नेस्तनाबूत करून आपले जवानाने शौर्य दाखविले आहे त्याचा सन्मानार्थ येत्या २० मे २०२५ रोजी हॅश टॅग तिरंगा यात्राचे नियोजन करण्यात आले आहे यात सर्व पक्षीय अध्यक्ष सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटना राजकीय शैक्षणिक कला क्रिडा क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत १००० दुचाकी १०००/५०० चारचाकी वाहन सह कमीत कमी ५००० हजार नागरिक यांच्या मध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी देशाचे जवानांचे शौर्य गाथा सांगुन मी ही सहभागी होणार आणी आपण ही सह परिवारासह सहभागी व्हाचे आवाहन केले आहे यामुळे उपस्थित राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या रॅली पाठिंबा दिला. यावेळी अल्पसंख्याक सेल चे मुस्लिम नेते गफुरभाई शेख यांनी पाकिस्तानचे निषेध व्यक्त करत जवानांनी दाखविलेल्या शौर्य बदल सलामी देत पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबाद ची घोषणा दिल्या यावेळी भारत माता की जय जय जवान जय किसान पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबाद असे सर्वांनी गगनभेदी घोषणा दिल्या याआढावा बैठकीत माजी नगरसेवक विशाल खंडेलवाल,माजी सैनिक अमित कुमार घाडगे, जेष्ठ नेते मृगन चावालियन, जेष्ठ नेते शक्तीवेल रामस्वामी, विनोद बहोत, सामाजिक नेते विलास शिंदे, जेष्ठ नेते आशिष शेलार , अभिमानु शिंदे, शांताराम कदम, गुरव्दारा प्रबंधक व भाजपाचे ज्येष्ठ नेते गुरमीत सिंग, रत्तू , चिराग खांडगे, दत्तात्रय पडवळ, शंकर भेगडे, वीराज शिरोडकर, सुरेंद्र भाटिया, मच्छिंद्र परंडवाल, रवींद्र काळोखे, अनिकेत साकोरे, देहूरोड बाजारपेठ व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आशिष बंसल , आरपीआयचे जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण, उमेश शिंदे, भगवान दरेकर, शिवसेना उबाठाचे नेते संदीप बालगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) चे अध्यक्ष मिक्की कोचर, पंडितराव बालघरे, भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीचे समन्वयक बाबू हिरेमटकर, भाजपाचे नेते सूर्यकांत सुर्वे, बाबू कोळी, साहील मोरे, भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे सचिव चंद्रशेखर पात्रे, मानव आधार सामाजिक संघ चे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर आदि उपस्थित होते.