उर्दु जबान का सफरनामा कार्यक्रम संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर :
पुणे.. उर्दु जबान का सफरनामा "गुफ्तगू"(क्या खोया क्या पाया) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख मार्गदर्शक उर्दु कारवाँ (मुंबई) अध्यक्ष जनाब फरीद अहमद खान उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन मा.जीत साहेब यांनी केले कार्यक्रमाला मा.फिरोज मुल्ला(सर)रिपाई (सचिन खरात गट) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करत म्हणाले भाषा ही आपल्याला रोजी रोटी मिळून देते त्या भाषेमध्ये आपल भविष्य घडत असतं पण उर्दु भाषा फक्त आता मुशायरा करण्यासाठी राहिली आहे अस दिसतय देशभरात मुशायरेच होतायत पण उर्दु भाषेमुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले अस फार कमी ऐकाला मिळत मुलांचे भविष्य उर्दु मध्ये सुधरेल तरच उर्दु मोठ्या प्रमाणात उंची गाठेल परंतु राजकारण याला जवाबदार आहे पण उर्दु ही मुस्लिमांची भाषा नाही ही मुस्लिमांवर ठपका लावलेली भाषा आहे पण ही उर्दु भाषा भारताची आहे हे समजून घेतलं जात नाही आणि मुस्लिम त्याला सोडत नाही आणि तो त्यासाठी ऐक शाळा उभी करतो आणि त्यामध्ये मुस्लिम मुलांना शिकवतो उर्दु भाषेला व्यापक करण्यासाठी सरकारी मराठी शाळेमध्ये शिकवली गेली पाहिजे मराठी शाळेमध्ये इंग्रजी व इतर भाषा शिकवल्या जातात तर उर्दु का नाही उर्दु शाळेमध्ये मराठी, इंग्रजी पण शिकवले जाते परंतु काही लोग हे होऊन देत नाही उर्दु भाषा व्यपाक विचाराने पुढे नेहली पाहिजे इतर समाजातील लोकांना उर्दु भाषाचे महत्व पटवून सांगितले पाहिजे
फक्त मुशायरे करून चांद सूरज जमीन जुल्फे आंखोकी तारीफ, प्रशषा केली जाते पण मुलांच्या भविष्याची प्रशषा त्या मुशायऱ्या मध्ये होत नाही हे दुर्दैव आहे त्यावर होणारी लाखो रुपयांची उधळपट्टी बंद केली पाहिजे गोरगरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे उर्दु भाषेचा योग्य पणे वापर केला तर त्यामध्ये यश मिळेल उर्दु भाषा मुस्लिमां पर्यंत मर्यादित नको ती उर्दु भाषा 140 करोड भारतीय जनते पर्यंत गेली पाहिजे उर्दु भाषेचा संदेश मुस्लिम व्यतिरिक्त उर्दु प्रेमी इतर समाजातील लोकांनी उर्दु भाषा व्यपाक करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सरकार पर्यंत आवाज पोहचवला पाहिजे परंतु हे सरकार करेल का नाही याची शंका आहे कारण त्यांना भाषेचे राजकारण करायचे आहे परंतु सर्व भाषांना महत्व मिळालेच पाहिजे त्याच अनुषंगाने संविधानिक मार्गाने भाषेमध्ये 22 नंबरला येणारीउर्दु भाषा आहे त्यांचेपण जतन झाले पाहिजे असे फिरोज मुल्ला (सर )यांनी मनोगत व्यक्त करत जनतेला संबोधित केले यावेळी चांदभाई बलबट्टी यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले उर्दु प्रेमी डॉ. कानडे साहेब,संदीपभाऊ शेंडगे, अमिताभ आर्या, अकबर शेख आदी मान्यवर उपस्थित होते