राज्यभर गाजत असलेल्या वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचे पोलीसांनी आवळ्या मुसक्या.

 आज पोलीस करणार शिवाजी नगर कोर्टात हजर तर भाजपाचा वतीने महिला पदाधिकाऱ्यांचे कोर्टाच्या आवारात आंदोलन.                                       

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 पिंपरी दि. :- राज्य भर खळबळ उडालेल्या वैष्णवी आत्महत्या प्रकरणी पोलीसांनी सासरे राजेंद्र हगवणे वैष्णवी आत्महत्या आणी मुलगा सुशील हगवणेचे अखेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट मधून अटक केली आहे. गेले सात दिवस पोलीसांना गुंगारा देत हे फिरत होते सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघ महाराष्ट्राचे राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली आहे.             

   गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशीला हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.काल दिवसभर राजकीय नेत्यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अस आश्वासन दिलं होतं. पोलिसांची सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना स्वारगेटमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी देखील फोन द्वारे कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अस आश्वासन दिले होते.  मागील सात दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देत "राजेंद्र हगवणेचा १७ मे ते आज पहाटेपर्यंत कुठे कुठे लपुनछपून फिरत होते"-

१७ मे– औंध हॉस्पिटल 

– मुहूर्त लॉन्स (थार गाडीने)

– वडगाव मावळ 

– पवना डॅम (फार्म हाऊस) 

– आळंदी येथे लॉजवर

१८ मे – वडगाव मावळ 

– पवना डॅम (बंडू फाटक कडे बलेनो गाडीने) 

१९ मे– पुसेगाव (सातारा) अमोल जाधव यांच्या शेतावर 

१९ मे आणि २० मे-

पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज) 

२१ मे-कोगनोळी (प्रीतम पाटील या मित्र्याच्या शेतावर) आज शिवाजी नगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे तर शिवाजी नगर कोर्टात भाजपाचे कार्यकर्ते हे सकाळ पासून कोर्टाच्या आवारात आंदोलन करण्यात येत आहे तर कोर्ट परिसरात महिलांनी नारी के सन्मान मे भाजपा मैदान मे , नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, वैष्णवी च्या सर्व कुटुंबीयांना फाशी झालीच पाहिजे तसेच यांना कोण कोण कुठे कुठे मदत केली आहे त्यांना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे संतप्त व्यक्त करत नारेबाजी करून आंदोलन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post