गुंड गजा मारणे यांची मटन पार्टी पुणे पोलिसांना भोवली , पुणे पोलीस दलातील एक अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांची निलंबन

प्रेस मीडिया लाईव्ह :

कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याला मटण बिर्याणी खाऊ घालणे पुणे पोलिसांच्या चांगलच अंगलट आलं आहे.गजा मारणेला बिर्याणी देणारे पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.त्याच बरोबर गजा मारणे टोळीतील तिघांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या कोथरूड परिसरात 24 फेब्रुवारी रोजी गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने एका आयटी इंजिनिअरला मारहाण केली होती. या प्रकरणात मकोकानुसार कारवाई करण्यात आली होती. गजाला 3 मार्च रोजी येरवडा कारागृहातून सांगली येथील कारागृहात स्थलांतरित करण्यात येत होते. तेव्हा काही पोलीस कर्मचारी एका ढाब्यावर जेवले. त्यांनी गजालाही मटण बिर्याणी खायला दिली. त्यावेळी पोलीस व्हॅनच्या मागे आणि पुढे गजा मारणेचे जवळपास 80 ते 100 साथीदार वेगवेगळ्या आलिशान गाड्यातून पाठलाग करत होते. त्यांनी गजा मारणेशी संवाद साधल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकेशनची माहिती देत या गुंडांना पोलिसांच्या गाडीसोबत येण्याची परवानगीही दिली. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू यांच्यासह गजा मारणे टोळीचे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही घटना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना कळली.

Post a Comment

Previous Post Next Post