शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर, तालुका - मुक्ताईनगर, जिल्हा - जळगाव आणि प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, आळंदी, जिल्हा - पुणे यांच्या संयुक्त उपक्रमाने घातली आंतरराष्ट्रीय विक्रमाला गवसणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि :- डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर (जळगाव) संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर, तालुका - मुक्ताईनगर, जिल्हा - जळगाव. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर हे गेल्या १५ वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून नुकतेच ०४ जानेवारी २०२५ रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त आणि आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या ७४५ व्या सप्तशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मोरया मंगल कार्यालय, आळंदी देवाची, तालुका - खेड, जिल्हा - पुणे या ठिकाणी ऐतिहासिक स्वरुपात संपन्न झाली. याप्रसंगी आदिशक्ती संत मुक्ताईकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना ७५० फूट लांब व ७५ किलो वजनाची राखी एमआयटीच्या महासंचालिका स्वातीताई साठे, कराड, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, कार्यकारिणी खजीनदार सौ. संगीता शिवचरण उज्जैनकर, संमेलनाच्या निमंत्रक सौ. रूपालीताई चिंचोलीकर व मान्यवरांच्या शुभहस्ते या दिवशी सकाळी आठ वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी येथे अर्पण करण्यात आली; या संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांनी विविध महान संतांच्या वेशभूषा करून टाळ मृदंगाच्या निनादामध्ये या ग्रंथदिंडीचे भव्य आणि दिव्य निघाली. याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी, साहित्यिक रसिक व विद्यार्थी, पत्रकार व आळंदीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही राखी एमआयटीचे संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजचे प्राचार्य तथा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांच्या कल्पनेतून त्यांनी तयार केली होती. हे संमेलन ऐतिहासिक, आध्यात्मिक व विश्व रेकॉर्ड करणारे ठरले या संमेलनाला एमआयटीचे संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेज, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती, आळंदी देवाची यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी वर्षातून दोन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन असे हे दोन मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा यशस्वीरित्या आयोजित केलेले आहेत. यापूर्वी कुर्हा, काकोडा, मुक्ताईनगर, पन्हाळा गड जिल्हा - कोल्हापूर, खामगाव जिल्हा - बुलढाणा, अमरावती तसेच गोवा राज्यामध्येसुद्धा साहित्य संमेलन यशस्वी आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झालेले आहे. आतापर्यंत हजारच्यावर विद्यार्थ्यांचा गौरव केलेला असून हजारच्यावर साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, शिक्षक, कलाकार आदींना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरवलेले आहेत. वाचन संस्कृतीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील २९ गावांमध्ये त्यांनी कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे स्मृती फिरते वाचनालय हा उपक्रमसुद्धा यशस्वीपणे राबवलेला आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने ७५० फूट लांब व ७५ किलो वजनाची राखी तयार केली त्यांची ही कृती खरोखरच एक आगळी वेगळी कलाकृती ठरली असून त्यांच्या या यशाची नोंद जगातील सर्वात प्रतिष्ठित हेरिटेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् कडून आंतरराष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली असल्याची माहिती हेरिटेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् या रेकॉर्ड बुकचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. सदर उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक होत आहे.