आर एम हायस्कूल मिरज विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल१००% टक्के

प्रेस मीडिया लाईव्ह : 

सांगली प्रतिनिधी : अशोक मासाळ 

शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित आर एम हायस्कूल  मिरज या विद्यालयाचा सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १००%टक्के लागला आहे. 

विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे घवघवीत यश संपादन करून शाळेचा निकाल शंभर टक्के मिळवून ऐतिहासिक असे यश प्राप्त झाले आहे. शाळेने प्राप्त केलेल्या यशामध्ये मा श्री मिलिंद जाधव सर अध्यक्ष तसेच श्री राहुल साळुंखे सर सचिव यांचे वर्षभर शाळेला मार्गदर्शन लाभले होते संस्थेचे सचिव श्री राहुल साळुंखे सर यांनी सन 2024 -२०२५ या शैक्षणिक वर्षात संस्थेच्या पाचही शाखांचा निकाल शंभर टक्के लागलाच पाहिजे यासाठी त्यांनी मिशन शतप्रतिशत हा उपक्रम राबवला होता या उपक्रमाला मुलांच्या कडून अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला त्यामुळेच खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असे यश विद्यालयास प्राप्त झाले आहे.

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 मध्ये गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे-----

१) कु. लक्ष्मी राणोजी नाईक 71% टक्के २)चि. ओंकार राजाराम शिंदे 61% टक्के ३)चि. आर्यन अशोक आवळे 57% टक्के ४) कु अक्षरा गणेश कोरे 56% टक्के.

शाळेतून घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या सर्व मुला-मुलींचे संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद जाधव सर ,संस्थेचे सचिव श्री राहुल साळुंखे सर, शाळेचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे त्रिवार हार्दिक अभिनंदन

Post a Comment

Previous Post Next Post