भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीने भव्य दिव्य बैनर खाली तिरंगा यात्राचे फुलांचे उधळण करत रॅली चे पुष्पहार श्रीफळ देऊन जंगी स्वागत .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. :- भारतीय जवानाच्या समर्थनात पहलगाम हल्लयाचे पाकिस्तान ला आपल्या वीर जवानी पाकिस्तानला नेस्तनाबूत करत चांगलेच धडा शिकवले या धडाकेबाज कारवाई पाकिस्तानच्या ११ एअरबेस व ९ अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून शंभरहून अधिक अतिरेक्यांचे खात्मा केले या विजयीचा समर्थनात हॅश टॅग तिरंगा यात्राचे आयोजन करण्यात आले होते
या तिरंगा यात्रेची सुरूवात जगतगुरु संत तुकाराम महाराज देवस्थान देहुगांव पासुन हॅश टॅग तिरंगा यात्राचे सुरूवात झाली आणि या तिरंगा यात्राचे ठिक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले हॅश टॅग तिरंगा यात्रेचे भव्य दिव्य स्वरूपात भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथे येताच भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद, हमसे जो टकराऐगा वो मिट्टी में मिल जाऐगा म्हणत जोरदार घोषणाबाजीने अख्खे परिसर दणाणून सोडले या रॅली चे पुष्प उधळुन समितीच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक व देहू देहुगांव देहूरोड मंडळचे रघुवीर शेलार यांचे जंगी स्वागत केले
या रॅली मध्ये ॴॅपरेशन सिंदुर च्या वाहनावर वीर जवानांचे चित्र कोरलेले व देशाचे वीरांगना सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे कोरलेले चारचाकी वाहनां हे या रॅली मुख्य आकर्षण होते हे चारचाकी वाहन शहरात प्रवेश करताच समितीच्या वतीने भव्य दिव्य स्वागत केले असंख्य ट्रॅक्टर, चारचाकी वाहन आणी दुचाकी वाहन असे लांबलचक रांग लागली होती व येणाऱ्या प्रत्येक वाहनावर पुष्पचा उधळण करीत जोरदार घोषणाबाजी करत भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीने स्वागत केले हॅश टॅग तिरंगा यात्राचे भव्य दिव्य स्वागत साठी चारचाकी वाहन वर राज्यांचे माजी कामगार मंत्री बाळासाहेब भेगडे सह माजी लष्करी जवान देशप्रेमी नागरिक उभे राहुन या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते यावेळी धो धो पाऊस पडत असताना देखील या रॅली चे भव्य दिव्य स्वागत भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ रामदास ताटे, सहसचिव चंद्रशेखर पात्रे, उपाध्यक्ष एम डी चौधरी, कार्याध्यक्ष अमोल नाईकनवरे,सह सचिव परशुराम दोडमणी, खजिनदार विजय पवार,सह खजिनदार बाबु हिरमेठकर कार्यकारी समन्वयक मोझेस दास, कार्यकारी समन्वयक जावेदभाई शेख, कार्यकारी समन्वयक श्रीमंत शिवशरण कार्यकारी समन्वयक प्रभाकर निकम यांनी हॅश टॅग तिरंगा यात्राचे स्वागत केले
या रॅली मध्ये प्रमुख सुरक्षा व्यवस्था म्हणून देहूरोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे उर्से परंदवडी पोलीस निरीक्षक तेजस्वी कदम, पीएसआय ठाकुर व त्यांचे सर्व पोलीस शिपाई हवालदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी व त्यांचे सहकारी देहुगांव पासुन देहुरोड पर्यत चोख बंदोबस्त ठेवला होता ही रॅली देहूरोड येथुन वडगाव मावळ येथे मार्गस्थ झाले. या रॅलीचे स्वागतासाठी समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांच्या नेतृत्वाखाली स्वागताचे नियोजन करण्यात आले होते.