पूर व्यवस्थापन प्रशिक्षणास तालुका व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार अनिल कुमार हेरकर यांची भेट

 शीघ्र प्रतिसादाची तयारी करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणारी वजीर रेस्क्यू फोर्स व अकॅडमीचे मुले व मुली वस्वयंसेवकांना सूचना

आपत्कालीन साहित्याची चाचणी व प्रात्यक्षिकाचे आयोजन

प्रेस मीडिया लाईव्ह :

औरवाड प्रतिनिधी :

 दि. 20/05/2025 : पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिल कुमार खेडकर यांनी  भेट देऊन आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी, तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणारी वजीर रेस्क्यू फोर्स च्या जवानांना उपस्थित राहण्याचे सूचना  दिल्या.



तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज नरसिंह वाडी येथील  कृष्णा पंचगंगा संगमावर श्री दत्त मंदिर घाटाजवळ सर्व साहित्याची तपासणी व चाचणी करण्यात आली. २० मे एक दिवशी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला 

या प्रशिक्षणामध्ये तालुका प्रशासनाकडे उपलब्ध असलेले सर्व साहित्य जसे की इन्फ्लेटेबल रबर मोटर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, रोप, इमर्जन्सी लाइट इत्यादीच्या साहाय्याने पूर व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणे, दोरीच्या साहाय्याने बचाव करणे, बोटीने शोधमोहीम राबवणे, बोट उलटल्यास बचावकार्य कसे करावे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

या कार्यक्रमात तालुका आपत्ती व्यवस्थापन  अधिकारी तहसीलदार अनिल कुमार केळकर साहेब.यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी  कृष्णा पंचगंगा संगम ठिकाणी नदीतील प्रात्यक्षिके बोटीद्वारे पाहिली.

 चालू तालुका व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार साहेब यांनी म्हणाले की, ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्तीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. प्रशासन आणि आपदामित्र सज्ज असून, आता लोकांमध्येही जलद प्रतिसादाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी बचाव कार्याचे योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे.’

या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात आपत्ती साधनांचा वापर करून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post