विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाहनाचा अपघात सर्वजण सुखरूप.

 फेसबुकवर आण्णा बनसोडे यांचे कार्यकर्ते चाहात्यांना संदेश                                


प्रेस मीडिया लाईव्ह : 

चंद्रशेखर पात्रे :

   पिंपरी दि. :- पिंपरी चिंचवड चे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे काल पुण्याहुन मुंबई कडे जाताना त्याचा वाहनाचे अपघात झाले होते या अपघातासंदर्भात स्वतः अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबतची माहिती दिली आहे.

 या अपघातात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी सुखरूप असल्याचे त्यांनी कळवले आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोशाल मिडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज पुण्याहून मुंबईकडे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी जात असताना माझ्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने मी आणि माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत.

माझ्या काळजीपोटी कॉल आणि मेसेज करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो. मी पूर्णपणे सुखरूप असून, नेहमीप्रमाणे तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.” असे फेसबुक वरून कार्यकर्त्यांना हितचिंतकांना संदेश दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post