प्रेस मीडिया लाईव्ह :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांकडे मोठी जबाबदारी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रवींद्र धंगेकरांना पुणे शहरात पक्षवाढीची जबाबदारी दिली आहे.
त्यानुसार, रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी (कार्यक्षेत्र -पुणे महानगर) निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले आहे. आता, धंगेकरांची निवड केल्यामुळे पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढू शकते. कारण पुण्यात धंगेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे, ज्याचा फायदा शिंदे गटाला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो.