प्रेस मीडिया लाईव्ह :
तांबवे येथील नामदेवदादा प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कृतज्ञता जीवनगौरव पुरस्काराचे वितरण खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला नामदेवदादा प्रतिष्ठान आयोजित मृदगंध व्याख्यान मालेलाही सुरुवात---- तांबवे येथील नामदेवदादा प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कृतज्ञता जीवनगौरव पुरस्काराचे वितरण खासदार धैर्यशील माने इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल व गिरीप्रेमी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवी दादा ढमढेरे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ सामाजिक नेते माणिकराव पाटील बहे शेतकरी नेते भगवानराव माने धोत्रेवाडी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रमोदआप्पा देशमुख कोरेगावभीमा कासेगाव शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस एस मोहिते सर बेलवडे बुद्रुक व जुनेखेडच्या लोकनियुक्त सरपंच सौ प्रियांका पाटील यांना प्रदान करण्यात आला
यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते खासदार धैर्यशील माने यांनी नामदेवदादा प्रतिष्ठानने गेली 21 वर्ष सातत्याने हे उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले माणूस पदाने नाही तर कर्तुत्वाने ओळखला जातो अशा कर्तुत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याची संधी मला मिळते हे माझे भाग्य आहे सध्याच्या संघर्षमय युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक दिलाने या संकटाला सामोरे गेले पाहिजे अशी भावना व्यक्त केली मंगलदास बांदल यांनी आपल्या मनोगत आतून या सत्कारमूर्तींच्या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेऊन तरुणांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे असे विचार मांडले डॉ श्रीमंत कोकाटे यांनी पुरस्कार निवडीच्या प्रक्रियेबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले आपल्या पुरस्काराला उत्तर देताना माणिकराव पाटील यांनी माझ्या 80 च्या दिशेने झुकलेल्या वयामध्ये या पुरस्काराने मला खूप मोठी प्रेरणा मिळालेली आहे तर प्रियंका पाटील यांनी लोकसभागातून गावचा विकास आपण साधू शकतो अशा भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा प्राप्त झाल्याबद्दल धनंजय जाधव कोकण कृषी विद्यापीठामधून गोल्ड मेडल राज्यपालांच्या हस्ते अधिक गुणवत्ता प्राप्त झाल्याबद्दल प्राप्त केलेल्या नेहा पाटील व नुकतेच पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आकांक्षा पाटील यांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रतिष्ठानचे खजानिस व तांबवेचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आभार प्रतिष्ठानचे संघटक सुशांत पाटील यांनी मांडले या कार्यक्रमाचे निवेदन विजय लोहार सर यांनी केले या कार्यक्रमासाठी तांबवे पंचक्रोशीतील व पुरस्कारांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत व सत्कार तांबवे ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष खराडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी एन पाटील सर उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले