प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने टेम्पोतून गुटख्याची वाहतूक केल्या प्रकरणी रविंद्र वसंत पाटील ( वय 33.रा रुई फाटा) याला पकडून त्याच्या कड़न 3 लाख 10 हजार रुपये किमंतीचा गुटखा आणि 5 लाख 50 हजार रुपये किमंतीचा टेम्पो असा एकूण ৪ लाख 60 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
पोलिस अंमलदार विशाल खराडे यांना माहिती मिळाली की,दि. 18 मे 2025 रोजी एक इसम टेम्पो नं. (MH-51-C-0446) या टेम्पोतून निपाणी येथून पुणे-बेंगलोर हायवेवरुन सांगलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी शिरोली एमआयडीसी परिसरातील बुधले मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून गुटखा वहातुक करणारा टेम्पो पकडला.
सदर टेम्पोत असलेल्या माला बाबत चालकाकडे विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी टेम्पोची झड़ती घेतली असता त्यात विमल पान मसाला, हिरा पान मसाला,महा.रॉँ.आणि व्ही-1 अशा एकूण 7 पोती भरलेल्या गुटखा आढ़ळल्याने पोलिसांनी टेम्पोसह जप त्याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस शेष मोरे, संतोष गळवे पोलिस अंमलदार विशाल खराडे,वैभव पाटील,योगेश गोसावी, प्रदिप पाटील, अमित सजे, आणि राजू कांबळे यांनी केली,