विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे -विजय भोजे

 कोळी महादेव,टोकरे कोळी जमातीची कार्यशाळा संपन्न.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : प्रतिनिधी :

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी दहावी,बारावी परीक्षेत आपली गुणवत्ता सिध्द करुन बुद्धिमत्ता दाखविली आहे.त्याबद्दल अभिमान वाटतो.विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद विजयराव भोजे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी महादेव, टोकरे कोळी जमातीच्या दोन दिवशीय कार्यशाळेच्या समारोपावेळी गुणवंत विद्यार्थी,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जमात बांधवांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.

 दि प्राथमिक शिक्षक बॅंक कोल्हापूर येथे दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.डॉ. मनोहर कोळी,प्रा.बसवंत पाटील,महादेव व्हंकळी,विनायक कोळी यांचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन झाले.

 प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन सुरेश कोळी,बीएसएनएलच्या सल्लागार समितीचे बाबासाहेब वनकोरे,मोडी लिपीचे अभ्यासक वसंत शिंघण,एलआयसीचे महेश माने, उपाध्यक्ष वैभव कोळी,डी.ए.कोळी, अंगद भोजे,सचिव रमेश शंकर कोळी,सहसचिव राजेंद्र कोळी, आण्णासो शिरगावे,सौ.मोहिनी कोळी,अरुण कोळी,उमेश कोळी,प्रकाश कोळी,प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरढोणे यांचा सन्मान करण्यात आला.

  याप्रसंगी सुरेश शंकर कोळी यांनी लिहिलेल्या "गंगावतरण " या शंकरराव कोळी (चिंतामणी) यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 यावेळी जिल्हयातील कोळी महादेव,टोकरे कोळी जमात बांधव,विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post