राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती विकास नगर येथे भव्य दिव्य रुपाने साजरा होणार.

  सन्माननीय होळकर वंशज यांची उपस्थिती सह पिंपरी चिंचवड व देहूरोड शहरासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होणार.                     

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड दि. :- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वा त्रिशताब्दी जयंती राजमाता अहिल्यादेवी होळकर जनविकास प्रतिष्ठान च्यावतीने येत्या ३१ मे २०२५ रोजी विकास नगर किवळे येथे साजरा करण्यात येणार आहे तसेच सकाळी १०:०० वाजता टी सी काॅलनी येथे सोहळा चौक नामकरण कार्यक्रम होणार सायंकाळी ५:०० वाजता पेंडसे काॅलनी ते धनश्री हाॅटेलच्या शेजारी मैदानात यांची सांगता होणार सायंकाळी ६:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सत्कार होणार रात्री ८:३० वाजता स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .


या कार्यक्रमात सन्माननीय होळकर वंशज श्रीमंत छत्रपती भुषणसिंह राजे होळकर श्रीमंत यशवंतराव महाराज होळकर (तृतीय) श्रीमंत छत्रपती स्वपनिल राजे होळकर, श्रीमंत अमरजीत राजे बारगळ (तळोदा संस्थान) हे उपस्थित राहणार आहेत तर पिंपरी चिंचवड विधानसभा चे आमदार शंकर पांडुरंग जगताप प्रतिष्ठानचे आधार स्तंभ व युवा नेते भावी नगरसेवक दिपक मधुकर भोंडवे सह महिला उत्सव समिती प्रमुख छाया सुभाष लवटे हे उपस्थित राहणार आहेत 

या कार्यक्रमाला  सर्वांना उपस्थित राहण्याचे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजकांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमात शहरातील अनेक दिग्गज नेते मंडळी आजी माजी आमदार खासदार नगरसेवक मंडळी उपस्थित राहणार आहे असे प्रतिष्ठेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भिसगे यांनी द प्रेस मीडीया लाईव्ह वृत्त वाहीनीला माहीती देताना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post