पुण्यात सेक्स तंत्र शिबिर अखेर रद्द ,पोलिसांनी हस्तक्षेप करत शिबिर होणार नसल्याचे जाहीर केले.प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सव असलेल्या पवित्र सणाच्या निमित्ताने पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या  वतीने यंदाच्या नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे ऑनलाईन बुकिंग  देखील घेण्यात येत होते. या संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होती. शिबिरा बाबत मनसे आणि हिंदू महासंघाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुणे पोलीस विभाग खडबडून जागे झाले आहे. सोबतच अश्या प्रकारचा कोणताही कार्यक्रम पुण्यात होणार नाही, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे. 

मेडीशनच्या नावाआड सेक्स तंत्र साधना शिबिर.? 

यावर पुणे पोलिसांनी भूमिका मांडली आहे. या जाहिरातीबाबत कालच आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही त्या संस्थेबद्दल संपूर्ण माहिती घेतली. ही संस्था महाराष्ट्रात रजिस्टर नाहीये. राज्याबाहेरील ही संस्था आहे, अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्या संस्थेच्या प्रमुखांशी संपर्क साधला असता मेडीशनसाठी आम्ही शिबिर भरवत असतो, असे त्यांनी सांगितले आहे. पण आता अश्या प्रकारचा कोणताही कार्यक्रम पुण्यात होणार नाही, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे.

हिंदूत्ववादी संघटना आक्रमक :

एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय शिबिराचा आयोजन करण्यात आलं होत.तरुण-तरुणींचा सहभाग असणार हे शिबिर निवासी शिबिर होतं ज्याची फी 15 हजार रुपये होती.यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार होते. नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम,पूजा पाठ,तसेच दांडिया अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.पण यंदा अश्या पद्धतीने कार्यक्रम होत असून हे पुण्याच्या संस्कृती साठी धक्कादायक मानले जात होते.पुणे शहरातील अनेक सामाजिक संस्था संघटनांनी याला विरोध केला होता. या संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बाबत आज पुणे शहर मनसे महिला आघाडी आणि हिंदू महासभेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे.

मनसे स्टाईलने आंदोलन : 

ज्यांनी कोणी नवरात्र उत्सवात या शिबिराच आयोजन केलं आहे. त्या आयोजकांवर मनसे महिला आघाडीची कारवाईची मागणी करण्यात आली होती. आयोजकांवर कारवाई न केल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करणार, असा इशारा देखील यावेळी मनसे महिला शहराध्यक्षा वनिता वागस्कर यांनी दिला होता. तसेच याबाबत हिंदू महासंघाच्या वतीने देखील पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्यात आलं होतं. हिंदू महासंघातर्फे जाहिरात फाडत या जाहिरातीचा निषेध करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण: 

 एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. तरुण- तरुणींचा सहभाग असणार हे शिबिर निवासी शिबिर असणार आहे. ज्याची फी 15 हजार रुपये आहे. यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ, तसेच दांडिया अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; पण यंदा अश्या पद्धतीने कार्यक्रम होत असून हे पुण्याच्या संस्कृतीसाठी धक्कादायक मानले जात होते. या मध्ये आला पोलिसांनी हस्तक्षेप करत शिबिर होणार नसल्याचे जाहीर केले.

Post a Comment

Previous Post Next Post