वडणगे येथे सहा महिन्यांच्या बालिके सह विवाहितेने घरा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

 सहा महिन्याच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. वडणगे (ता. करवीर) येथे सहा महिन्यांच्या बालिके सह विवाहितेने घरा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.यामध्ये अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. तनुजा चव्हाण असे त्या चिमुकलीचे नावआहे. तर मोनिका चव्हाण हिला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान याबाबत या महिलेने कोणत्या कारणावरून हे कृत्य केले याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील चौगले मळ्यात लमान समाजातील परशुराम चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत वडणगे येथे राहतात. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी मोनिका आपल्या सहा महिन्यांच्या तनुजा या मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. घराजवळ असलेल्या विहिरीत मुलीसह त्‍यांनी उडी घेतली. विहिरीजवळ असलेल्या नागरिकांना ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे मोनिका आणि बाळाला तातडीने बाहेर काढण्यासाठी धावाधाव सुरू झाली परंतु बाळ वाचवण्यात यश आले नाही. मोनिकाला बाहेर काढण्यात यश आले.

मोनिका हिला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठाला आली. त्यानंतर तिला नागरिकांनी बाहेर काढले, मात्र या घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. करवीर पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post