पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार , मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे - पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र दोन्ही लशी घेणाऱ्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

सर्वांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे. सर्व नियम पाळले पाहिजे. दुकानांचे मालक आणि सेल्समन हे बऱ्याचदा मास्क वापरत नाही ही तक्रार आहे. मात्र नियमांमध्ये शिथिलता हवी असेल तर खबरदारी घेतली पाहिजे ही मी नम्र विनंती करतो.

Post a Comment

Previous Post Next Post