साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार अरविंद देशपांडे कोल्हापूर* यांना जाहीर....



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 शिक्षण मंडळ कराडच्या वतीने "गुरुपौर्णिमेचे" औचित्य साधून प्रतिवर्षी दिले जाणारे विविध शैक्षणिक पुरस्कार जाहीर झाले असून उच्च शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा  *साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार अरविंद देशपांडे कोल्हापूर* तर डॉ.रा.भा.देवस्थळी पुरस्कार प्रसिद्ध लेखक, शिक्षक, प्राचार्य,ज्योतिषाचार्य  माजी प्राचार्य रमणलाल शहा यांना देण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी व सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली,

अन्य शैक्षणिक पुरस्कार खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत

कै. रा.गो.प्रभुणे अमृतमहोत्सवी शिक्षणसंस्था भुषण तथा विद्यारत्न पुरस्कार अमित कुलकर्णी  अध्यक्ष श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी सातारा, यांना देण्यात येणार आहे,

स्व,शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी स्मृति आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.अस्मिता पोतदार मुख्याध्यापिका, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर, कै.द.पां. तथा बाळासाहेब पाठक स्मृति आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार सौ.सुरेखा वासुदेव महिशी माजी मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यमाची शाळा कराड, गुरुमाऊली प्राचार्य अल्बर्ट डिसुझा आदर्श प्राध्यापक पुरस्कार डॉ.मधुरा जगताप संचालक डॉ.डी. वाय.पाटील युनिव्हर्सिटी पुणे यांना देण्यात येणार आहे.

पंढरीनाथ हरी तथा तात्यासाहेब वझे स्मृति प्रिथ्यर्थ उत्कृष्ठ नाट्यकर्मी पुरस्कार प्रशांत शशिकांत कुलकर्णी यांना. कै, नानासाहेब देशपांडे व कै. श्रीमती गंगाबाई देशपांडे यांचे स्मरणार्थ उत्तम शिक्षक पुरस्कार किसन फडणीस वाघमारे उपमुख्याध्यापक टिळक हायस्कूल कराड यांना देण्यात येणार आहे.

कै. बापूराव रावजी मुजुमदार यांचे स्मरणार्थ उत्तम शिक्षक पुरस्कार(प्राथमिक विभाग) सौ.स्नेहल लक्ष्मीकांत वाळिंबे  मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यमाची शाळा (प्राथमिक विभाग).  कै. प्रभाकर वासुदेव परांजपे (कै. नानासाहेब देशपांडे यांचे सेवक) यांचे स्मरणार्थ उत्तम सेवक पुरस्कार श्री.गणेश नारायण इनामदार सेवक इंग्रजी माध्यमाची शाळा कराड यांना तर कै. सौ. सुलोचना कानडे स्मरणार्थ साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार टिळक हायस्कूलच्या,१० वी ब मधील अथर्व संदिप जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे, 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत, यामुळे परिस्थितीत सुधारणा झाल्यावर होणाऱ्या "गुणगौरव" समारंभात माजी प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिषाचार्य, सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी व सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली

Post a Comment

Previous Post Next Post