रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या आक्रमक भुमीकमुळे बालविकास प्रकल्प अंतर्गत धाऩ्य पुरविणार्या गाेडाऊनवर आन्न व आैषध प्रशासनाची कारवाई .





इचलकंरजी प्रतिनिधि श्रीकांत कांबळे 

*महाराष्ट्र शासनाच्या वतीने बालविकास प्रकल्प अंतर्गत 3 ते 6 वर्षे वयाच्या लहान मुलांना त्याचे शरीर तंदुरुस्त रहावे या उद्देशाने   चांगल्या व विविध प्रकारचे धान्ये देण्याची योजना सुरु केली आहे.पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बर्याच अंगणवाडीना हे धान्य वेळेत व चांगल्या प्रकारचे मिळत नाही.हि बातमी रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांना समजताच त्यांनी ते सर्व   प्रकारचे निषकृट दर्जाचे धान्य घेऊन आपल्या कार्यकर्त्यांन सोबत थेट जिल्हा परीषद गाठले.व  जिल्हापरीषद कार्यकारी अधिकारी रसाळ साहेब यांना जाब विचारुन धान्याचा वजनातील तुट व धन्याचा दर्जा पाहण्यासाठी सांगून धारेवर धरले.इतक्यावरच न थांबता दादांनी रसाळ साहेबांना घेऊन संबंधित धान्य गोडाऊन वर धाड ठाकण्यसाठी भाग पाडले.* 

             *दादांची व कार्यकत्याची आक्रमक भुमीका पाहिल्या नंतर रसाळ साहेबांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना फोन करून धान्य गोडाऊनवर येण्यासाठी सांगीतले.पण दादांनी रसाळ साहेबांना स्वतः गोडाऊनवर येण्यासाठी भाग पाडले.यावेळी दादाच्या समवेत मग बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहास बुधले,अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एम.एस.केबळेकर,टि.एस.शिंगाडे,अन्न सुरक्षा अधिकारी एस.जी कर्ण मँडम,एस.एम.मासाळ,नमुना सहाय्यक एस.एम.तोडकर या सर्व अधिकारी यांनी गोडाऊनवर धाड ठाकल्या नंतर मोठा धक्काच बसला.ज्या लहान मुलांना त्याचे शरीर तंदुरूस्त रहावे म्हणून शासनाने धान्ये देण्यासाठी जी योजना सुरू केली आहे.ते पँकींग करीत असलेले गोडाऊन धुळीने व अस्वच्छतेने भरलेले होते.त्याच बरोबर सर्वच प्रकारचे धान्य निकृष्ट दर्जाचे होते.पँकींग मध्ये तसेच वजनात तफावत होती.त्यामूळे दादांनी गोडाऊन सील करून व संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून व त्या सर्वच धान्याचे नमूने तपासण्यासाठी घेण्यासाठी लेखी पत्र देणार नाही तो पर्यत आम्ही तुम्हांला जाग्यावरून हालू देणार नाही अशी आक्रमक भुमिका घेतल्या नंतर सर्वच अधिकारी यांनी साखर,तुर डाळ,चणे,मुग डाळ,हळदपूड,मीठ,मसूरा डाळ अशा सर्वच प्रकारची धान्ये तमासणी साठी घेतली.व गोडाऊन सील करण्यासाठीचे पत्र दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.हि कारवाई रात्री 11 वाजेपर्यंत चालू होती.* 

               *यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ,युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे,कामगार प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे,शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे,मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे,कामगिर शहर अध्यक्hष प्रदिप मस्के,करवीर कार्याध्यक्ष जयशींग पाडळीकर,करवीर युवा अध्यक्ष सुभाष कांबळे,खांडेकर सर,अजित कांबळे,अमित काळे यांच्यासह RPI चे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post