दतवाड येथे पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी .




युनूस लाडखान.

दत्तवाड-  दतवाड येथे पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाले असून गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी कुत्र्यांच्या टोळीने दोन वर्षाच्या व सात वर्षाच्या दोन लहान मुलांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे त्यापैकी दोन वर्षाच्या सूर्या खत्री याला सांगली येथील सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल केली आहे

        दत्तवाड ता शिरोळ येथे दोन महिन्यापूर्वी कुत्र्यांनी हल्ला करून एका महिलेला ठार केले होते तर तीन पुरुषांना गंभीर जखमी केले होते त्यानंतर ग्रामपंचायतीने कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती यानंतर कुत्र्यांची संख्या कमी होऊन गावात कुत्र्यांचे होणारे हल्ले कमी झाले होते मात्र गुरुवारी रात्री आंबेडकर नगर येथील या सात वर्षीय  श्रेयस कांबळे या बालकावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावा घेतला आहे त्याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवले असतानाच शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सूर्या खत्री या दोन वर्षीय बालकावर घराच्या मागच्या बाजूला शाळेच्या मैदानात खेळत असताना सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केला लगत असणाऱ्या प्रवण हेमीगिरे यांनी वेळेत धाव घेऊन कुत्र्या पासून त्या बालकाची सुटका केल मात्र कुत्र्याने तोंडावर पाठीवर मांडीवर चावा घेऊन गंभीर जखमी केले त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सूर्या चे वडील हॉटेल कामगार असून लहान मुलावर हल्ला होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामपंचायतीने याबाबत कठोर कारवाई करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post