गावठी दारू वाहतूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुप्त माहिती द्वाराच्या माहितीने आरोपीस सापळा रचून रंगेहात पकडले

 


प्रेस मीडिया लाईव्ह  :

विशेष प्रतिनिधी :

गावठी दारूला बंदी असताना अशाप्रकारे दारू बनवून विक्री करत असणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांना यश आले आहे

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांनी या अगोदर सहा वर्ष मर्डर केस चा गुन्हा उघड किस आणला असून या परिसरात त्यांचे कौतुकास्पद होत आहे तसेच गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत

आज रोजी रसायनी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनी पोमण व पथक  यांना गोपनीय बातमी दाराद्वारे खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम मोटरसायकलवर अवैधरीत्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची खारपाडा ते रासायनी अशी वाहतूक करीत असले बाबत माहिती मिळाल्याने रसायनी पोलीस ठाणे हद्दीत कराडे गाव येथे सापळा लावून एक इसम नामे संतोष  बाबुराव घरत राहणार खारपाडा तालुका पेन जिल्हा रायगड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 लिटर गावठी हातभट्टी दारू  किंमत 6000/-व 1 बजाज डिस्कवर कंपनीची मोटरसायकल किंमत 50000/- असा एकूण 56000/- रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल त्याचे ताब्यातून जप्त केला असून पंचनामा करून सदर जप्त मुद्देमाल  व आरोपी हा पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता रसायनी पोलीस ठाणे यांचे कडे रिपोर्ट सह सुपूर्द केला आहे.

कार्यवाही पथक -सपोनी/ पोमन Asi राजेश पाटील,प्रसाद पाटील ,Hc संदीप पाटील, राकेश म्हात्रे,  सुधीर मोरे, यशवंत जेमसे  यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post