नॅशनल पब्लीक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना फी माफी आणि सवलत कोविड काळातील पालकांची स्थिती पाहून निर्णय



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे :अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नॅशनल पब्लीक स्कुलमध्ये  शैक्षणिक वर्षात २०२०-२१ साठी नर्सरी, एल. के.जी., यु.के.जी. विद्यार्थ्यांना संपुर्ण  फी माफी, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के तर नववी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ टक्के फी माफी देण्यात आली आहे.

या सर्व विद्यार्थांना टप्प्या टप्प्याने फी भरण्याची सवलत देण्यात आली आहे.

कोविड काळातील पालकांची हलाखीची स्थिती पाहून , सामाजिक भान ठेवून हा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत  घेतला आहे. अक्सा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.तारिक अन्वर पटेल, मुख्याध्यापक अंजुम फिरदोस पटेल , आदी उपस्थित होते.

नॅशनल पब्लीक स्कुल ही जाधवनगर कात्रज परिसरातील शाळा असून आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.सामाजिक भान ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकवर्गात त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. संचालक मंडळाचे अभिनंदन केले जात आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून दिलासा मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया पालकवर्गाने व्यक्त केल्या.शाळेला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुलशेठ जाधव यांनीही संस्थाचालकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post