पनवेल शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोल्ड डिगर बार मध्ये बिलाच्या रकमेवरून ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा..

पनवेल शहर पोलिस डान्स बार चालकांकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे डान्स बार चालकांची वाढली मुजोरी....

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डान्स बारसह इतर अवैध धंद्याना ठाकरीबाणा दाखवण्याची नागरिकांची मागणी......


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रभर चालणाऱ्या गोल्ड डिगर या डान्स बार मध्ये बिलाच्या रकमेवरून ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आलेय. दिवाकर शेट्टी आणि बार मधील कर्मचारी प्रदीप शेट्टी, जगदीश राय, दत्तात्रय पाटील यांनी ग्राहक आणि त्याच्या मित्राला लोखंडी रॉड, लाकडी बांबू आणि वायरीने जबर मारहाण केली असून या मुजोरी विरोधात ग्राहकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेय. 

पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मात्र अवैध डान्स बार चालकांची मुजोरी वाढत चालली असून पनवेल शहर पोलीसांनी वाढत्या मुजोरीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतायत. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध व्यवसाय दवखील मोठ्या प्रमाणात चालू झाले असून या मुजोर डान्स बार चालकांसोबतच अवैध धंद्यावर देखील ठाकरीबाणा दाखवावा अशी मागणी नागरिक करत आहेत......

Post a Comment

Previous Post Next Post