इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये बैठक पार पडली.





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  इचलकरंजीतील दुकाने सुरु करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.  या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस स्टेशन, इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 

या बैठकीत इचलकरंजीला दुजाभावाची वागणूक दिली असल्याने सोमवारपर्यंत इचलकरंजीसह जिल्ह्यातील आवश्यक सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवांसह सर्वच आस्थापना सुरु करण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास सोमवारी इचलकरंजीत रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्यासह दुकाने सुरु केली जातील, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी यावेळी दिला. 

तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे  आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा पाठपुरावा सुरु आहे. जिल्हा प्रशासनासोबतही समन्वय साधण्यात येत असून दुकाने सुरु होण्यासंदर्भात दिवसभरात प्रशासनाकडून आदेश प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे सांगत व्यापार्‍यांनी संयम बाळगावा. शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन असल्याने सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास 12 जुलै रोजी सकाळी शिवतीर्थ येथे आंदोलन छेडून शहरातील सर्वच भागातील दुकाने कोणत्याही परिस्थिती उघडण्यात येतील, असा इशारा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिला. 

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह इचलकरंजीतील पदाधिकारी यांच्यासह पत्रकार व व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post