कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.






इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

इचलकरंजी शहरावर दुसर्‍यांदा कोरोना महामारीचे संकट उद्भवले आहे. या संकटाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. सध्या शहरात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अतिरिक्त 14 अशा 21 केंद्रांद्वारे लसीकरण सुरु आहे. ही केंद्रे वाढविण्याची गरज असून आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केलेल्या मागणीनुसार आणखीन नवीन 32 मिळून 51 लसीकरण केंद्रे व या केंद्रावर आवश्यक स्टाफची आवश्यकता असल्याने या केंद्रावर काम करण्याची तयारी असलेल्या इच्छुकांनी पुढाकार घेऊन शहरवासियांना मदतीचा हात द्यावा. व ही नियुक्ती व त्यासाठीचे मानधन शासनाकडून मिळावे यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या बैठकीस आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, राजू मगदूम, संजय आरेकर, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post