इचलकरंजी : मनू फरास :
इचलकरंजी येथील जवाहरनगर भागात छत्रपती संभाजी विद्यामंदिर येथे लशीकरण केंद्र आहे पण त्याला वेळ नाही , सकाळी सहा वाजले पासून नंबर लावून उभे होते , दुपारी 12.45 वाजता लस येणार होती पण लसीकरण केंद्रच बंद असल्यामुळे लोकांना कडक उन्हात राहून प्रतीक्षा करावी लागत होती. दुपारी लस आले नंतर 120 लोकांना आत मध्ये घेऊन दार बंद करण्यात आले. बाकीचे नंबर नोंद ज्यांनी केले होते त्यांना परत उद्या नविन नोंदणी करणेस सांगितले असून परत लोकांना भर उन्हात राहून प्रतीक्षा करावी लागणार. हे असेच चालणार का..? असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे. याचा अर्थ प्रशासनाच्या सवडी नुसार नागरिकांना लसी करण करण्यात येणार असेच होतो.