कोरोनाला थोपवायचे असेल तर शासकीय नियमानुसार लस घेणे अत्यंत गरजेचे ... माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेइचलकरंजी (प्रतिनिधी) : -

कोरोनाला थोपवायचे असेल तर शासकीय नियमानुसार लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. मी लस घेतली असून ती पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी कोविड 19 ची लस घ्यावी, असे आवाहन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले आहे.

मार्च 2020 पासून देशभरात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. तो थांबला असे वाटत असतानाच दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याला रोखण्यासाठी केंद्र शासनाने कोविड 19 ची लस संपूर्ण देशभरात पुरविली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनीच ही लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच अनुषंगाने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शुक्रवारी येथील अलायन्स हॉस्पिटल येथे जावून कोविडची लस घेतली.

यावेळी त्यांनी ही लस अत्यंत सुरक्षित असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी न चुकता लस घ्यावी आणि स्वत:सह आपले कुटुंब आणि देशवासियांची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

 

भविष्यात प्रदुषणामुळे निर्माण होणार्‍या अडचणी उद्भवू नयेत यासाठी आताच झिरो डिस्चार्ज प्रकल्प (झेडएलडी) राबविणे ही काळाची आहे.


इचलकरंजी (प्रतिनिधी) -

भविष्यात प्रदुषणामुळे निर्माण होणार्‍या अडचणी उद्भवू नयेत यासाठी आताच झिरो डिस्चार्ज प्रकल्प (झेडएलडी) राबविणे ही काळाची आहे. काळानुरुप झपाट्याने बदल होत असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन कोणाचीही गय करणार नाही. त्यासाठी शहरातील टेक्स्टाईल प्रोसेसिंग व्यवसायात झिरो डिस्चार्ज प्रकल्प राबवावा. त्यासाठी शासन स्तरावरुन आवश्यक ते मिळवून देण्यासाठी मी सहकार्य करीन, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी येथे बोलताना दिली.

शहर व परिसरातील टेक्स्टाईल प्रोसेसधारकांनी सध्या भेडसावणार्‍या समस्या, भविष्यातील अडचणी या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रदुषण रोखण्यासाठी शासनाची भूमिका आणि त्यासाठी प्रोसेसधारकांनी करावयाच्या उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती दिली.

वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोशिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता यांनी, 42 दिवसाच्या बंदनंतर काही प्रोसेस सुरु झाल्या आहेत. सीईटीपी प्रकल्पही चांगल्या पध्दतीने सुरु असला तरी पाणी झिरो डिस्चार्ज म्हणजेच पाण्याचा एकही थेंब विनाप्रक्रिया बाहेर सोडणे हा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प राबविण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी आमदार आवाडे यांच्याकडे केली. संदीप मोघे यांनी, झेडएलडी प्रकल्प उभारणीसाठी सीईटीपीकडून चार एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे.   हे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. ते काम पुढे नेण्यासह आमदार आवाडे यांनी सहकार्य करावे. झेडएलडी प्रकल्पासाठी सर्वच टेक्स्टाईल प्रोसेसर्स आपला हिस्सा देण्यास तयार आहेत. त्याचबरोबर सध्या सुरु असलेला प्रकल्पही कार्यान्वित ठेवण्यात यावा असे सांगितले. कामगार नेते शामराव कुलकर्णी यांनी, केवळ आंदोलने करुन हा प्रश्‍न सुटणार नसून हा नागरी प्रश्‍न असल्याने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार आवाडे यांनी, उद्योगधंदा चालला पाहिजे, रोजी-रोटी टिकली पाहिजे, औद्योगिक विकास झाला पाहिजे. पण हे करत असताना प्रदुषण नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे. प्रदुषण संदर्भात शासन गंभीर असून प्रदुषित घटकांना कोणत्याही प्रकारची सवलती मिळणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनाही अत्यंत कठोर आहेत. त्यासाठी झेडएलडी प्रकल्प काळाची गरज असून केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध होणारे अनुदान मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु असे सांगितले.

यावेळी प्रकाश दत्तवाडे, श्रीनिवास बोहरा, नरसिंह पारीक, संभाजी लोकरे, संदीप सागावकर, राजेश सावंत आदींसह प्रोसेसधारक उपस्थित होते.Post a comment

0 Comments