हडपसर परिसरातील वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले ,. याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबूल दिली.




 पुणे - हडपसर परिसरातील वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबूल दिली. आरोपींनी संबंधीत व्यक्ती जवळील पैसे काढून घेतले. यानंतर त्याला पर्वती येथील शंकर मंदिरालगत असलेल्या वॅâनॉलजवळ नेऊन डोक्यात दगड घालून मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून दिला.

सतीश संजय सुतार (रा.सिंहगड रोड), मिलींद पवळे (धायरी फाटा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, राहुल श्रीकृष्ण नेने (४५, सदाशिव पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १५ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसरमधील शिंदेवस्ती परिसरातील नेने यांचा खून झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालावरून स्पष्ट झाले. यानूसार खूनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून तपास सुरु होता.

दरम्यान, पोलिसांनी कॅनॉलगतच्या लोकांकडे विचारपूस केली. तसेच, परिसरातील जवळपास २५० सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक तपासणी केल्यानंतर पोलिसांना नेने हे सिंहगड रस्ता भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नेने राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली असता नेने हे १३ मार्चच्या रात्रीनंतर घरी आले नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी सिंहगड रस्त्यावरील राजाराम चौक, संतोष हॉल, दांडेकर पुल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता नेने यांना एका मोपेड गाडीवर बसवून नेत असल्याचे आढळून आले.

फुटेजवरून तपास केला असता संजय सुतार व त्याचा साथीदार मिलींद पवळे असल्याचे समजले. त्यांना विश्वासात घेत माहिती घेतली असता त्यांनी खून केल्याची कबूल दिली. आरोपींनी नेने यांना मोपेडवरून दांडेकर पुलाजपरिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता नेने यांना एका मोपेड गाडीवर बसवून नेत असल्याचे आढळून आले. फुटेजवरून तपास केला असता संजय सुतार व त्याचा साथीदार मिलींद पवळे असल्याचे समजले. त्यांना विश्वासात घेत माहिती घेतली असता त्यांनी खून केल्याची कबूल दिली.

आरोपींनी नेने यांना मोपेडवरून दांडेकर पुलाजवळील एस.बी.आयच्या एटीएममध्ये नेऊन मारहाण करून त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. नेने यांना जिवंत ठेवले तर ते आपली ओळख पोलिसांना सांगतील, या भितीपोटी आरोपींनी त्यांना पर्वती येथील कॅनॉलजवळ नेत डोक्यात दगड घातला. यानंतर त्यांना कॅनॉलमध्ये टाकून त्यांचा खून केल्याची कबूली दिली आहे.

ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, सौदोबा भोजराव, अविनाश गोसावी, नितीन मुंढे, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली. 

Post a Comment

Previous Post Next Post