तिजोरीत खडखडाट मात्र घोषणांचा गडगडाट.... माजी आमदार मोहन जोशी .



पुणे - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट मात्र घोषणांचा गडगडाट, असे अंदाजपत्रक भाजपने महापालिकेत मांडले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

महापालिकेत गेली चार वर्षे भाजपची सत्ता आहे. चार वर्षांत कोणतीही चमकदार कामगिरी भाजपला करता आलेली नाही. आता वर्षभराने निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने पोकळ आश्‍वासने, घोषणा यांचा वर्षाव सुरू आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी मांडलेले 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक त्याचाच नमुना आहे.गेल्या तीन वर्षांत अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दीष्ट भाजपला गाठता आलेले नाही. ही वस्तुस्थिती असताना यंदा अंदाजपत्रक फुगवून 8 हजार कोटीहून अधिक रकमेचे मांडून पुणेकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे, पण सुज्ञ पुणेकरांनी भाजपची चलाखी ओळखली आहे, असे मोहन जोशी यांनी नोटबंदीपासून बांधकाम व्यवसाय मंदित सापडला. त्याचा परिणाम शहराच्या आर्थिक उलाढालींवर झाला. तेव्हापासून महापालिकाही आर्थिक पेचात सापडत गेली आणि आर्थिक गाडा अधिक रुतत गेला आहे.


पुणे महापालिकेने उत्पन्नवाढीचे ठोस प्रयत्न चार वर्षांत केले नाहीत. त्यामुळे करोना संकटाला महापालिका आर्थिकदृष्ट्या तोंड देऊ शकली नाही. उत्पन्नवाढीचा निश्‍चित कार्यक्रम नाही, तिजोरीत खडखडाट आहे आणि कधीही पूर्ण होऊ करणार नाहीत अशा घोषणांचा गडगडाट भाजपच्याअंदाजपत्रकात आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post