महापालिकेच्या वतीने थकबाकीदार मिळकतदारांच्या ओपन जागेचा जाहीर लिलाव केला जाणार



सोलापूर :  महापालिकेच्या वतीने थकबाकीदार मिळकतदारांच्या ओपन जागेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. याबाबतची तयारी महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 ओपन जागांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे.

सोलापूर शहरातील मिळकत करांच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. थकबाकी रक्कम एकवट भरणाऱयांना प्रशासनाच्या वतीने विशेष सवलत योजना देत आहे. मार्चअखेर टॅक्सची थकबाकी भरणाऱयांना 50 टक्के शास्ती व दंड माफ केला जात आहे, तर वसुली पथकास प्रतिसाद न देणाऱया मिळकतदारांवर कारवाई करत जप्तीची कारवाई केली आहे.मात्र, शहरात मोठय़ा प्रमाणात ओपन जागा आहेत. या ओपन जागांच्या मालकांचा शोध लागत नाही. परिणामी या मिळकतदारांकडे अनेक वर्षांपासून कोटय़वधींची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे. या ओपन जागांवर आता कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने तयार केला आहे. या ओपन जागांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाच्या वतीने तयार केला आहे.

शहरातील मोठय़ा थकबाकी असलेल्या शंभर थकबाकीदारांची नावाची यादी प्रशासनाच्या वतीने तयार केली आहे. या ओपन मिळकतीचा जाहीर लिलाव करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने तयार केला आहे. हा प्र्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या वतीने सादर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगित तत्त्वावर 50 जागांचा जाहीर लिलावाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाच्या वतीने चालू आहे.

190 बिगारी कामगार पुन्हा प्रभागात

प्रशासनाच्या वतीने प्रभागातील 190 बिगारी इतर कर्मचाऱयांची सेवा झोन विभागाकडे वर्ग केली होती. या कर्मचाऱयांना वर्ग केल्यामुळे प्रभागातील कामे खोळंबली होती. या कर्मचाऱयांना पूर्वीच्या कामात बदल न करण्याची तक्रार कामगार कृती समितीच्या वतीने पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार पालिका आयुक्तांनी कामगार कृती समितीची मागणी लक्षात घेत या 190 कर्मचाऱयांची सेवा पुन्हा वर्ग केली आहे. तसे आदेश प्रशासनाच्या वतीने काढले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post