खॉजा शमना मीरासाहेब दर्गा उरूस भरविण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला आहे.मिरज :  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खॉजा शमना मीरासाहेब दर्गा उरूस दि. 9 मार्चपासून सुरू होत आहे. परंतु, उरूस भरविण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मीरासाहेब दर्ग्याचा यंदा 646 वा उरूस आहे. परंतु संदल, मानाचा गलेफ यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांना भाविकांना येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.उरुसापूर्वी प्रथेप्रमाणे रविवारी मंडप उभारणीला सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी देखील कोरोनामुळे उरूस रद्द करण्यात आला होता.

संगीत सभेची प्रथा खंडित शेकडो वर्षांपासून मीरासाहेब दर्ग्यात चिंचेच्या झाडाखाली संगीत सभा भरविण्यात येत देशभरातून अनेक गायक, वादक येथे आपली कला सादर करण्यासाठी येत असतात. परंतु, कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी ही परंपरा खंडित झाली आहे.

Post a comment

0 Comments