संभाजी ब्रिगेड च्या वतीने मिलिंद एकबोटे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल, ८ दिवसात जर आरोपी वर मोक्या ची कार्येवाही नाही झाली तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व संघटनांच्या वतीने देण्यात आला आ
 

पुणे :   पूणे महानगर पालिकेने कोंढवा हज हाऊस निर्माण करण्यासाठी निर्णय घेतला. या विरोधात  दि.०२. ०३.२१ रोजी नामे मिलिंद रमाकांत एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष यांनी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कर पणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्यहानी आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमवून एकत्रित संघटित करून गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेचा बादक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केली आहे व सदरील भाषणे आरोपीने दंगली घडवून दहशत माजविण्याचा हेतूने हेतूपुरस्सर सदरील भाषणाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारित केले आहे तसेच एक आक्षेपार्ह मजकुराचे पत्र पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे सदर गंभीर प्रकाराबाबत  संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी  दि. ०५.०३.२०२१ रोजी या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करणेबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशन ला मिलिंद रमाकांत एकबोटे विरोधात  कलम १५३, १५३अ, १५३ब, २९५अ, २९८, ५००, ५०१, ५०२, ५०५(१)(क), ५०५(२) व ३४ &  १२०ब  भारतीय दंड संहिता, १८६० &  कलम ६६अ व ६६ब  माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष  सतीश काळे यांनी फिर्याद दाखल केली . त्यांना याकामी  कायदेशीर मदत ॲड तोसीफ शेख, ॲड  क्रांती सहाणे यांनी केली.


 सदरील भाषणाचे वक्तव्य पुढीलप्रमाणे

             "कोंढव्यामध्ये हज हाऊस बनण्याचे काम पुणे महानगरपालिकेने चालू केले आहे. ते अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. या ठिकाणी अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. समस्त हिंदू आघाडी आपली ताकद पणाला लावेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, की समस्त हिंदू आघाडी काहीही झालं तरी महानगरपालिका प्रशासनाचा हज हाऊस चा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही." जय श्रीराम! "

            सदरील संभाषण हे धार्मिक व जातीय भावना दुखावण्याचा उद्देशाने शब्द उच्चारून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे तसेच धर्माच्या नावाने जातीय दंगली घडविण्याचा हेतूने सदरील आरोपीने जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर पणे शत्रुत्व वाढविणे आणि हिंदू-मुस्लीम एकोपा टिकविण्यास बाधक असे सार्वजनिक ठिकाणी सामूहिकपणे कोंढवेकरांची व कोंढव्याची गंभीर स्वरूपाची बदनामीची वक्तव्य केले आहे तसेच सदरील वक्तव्यामुळे पुण्यामध्ये विशेषता कोंढवा परिसरातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग होऊन जातीय दंगली घडविण्याचा हेतूने केले आहे व तसे झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार मिलिंद रमाकांत एकबोटे हेच राहतील.

             दिनांक ०२.०३.२१ रोजी मिलिंद रमाकांत एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर पणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्य आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमवून एकत्रित संघटित करून गैरमार्गाने बेकायदेशीर रित्या राष्ट्रीय एकात्मतेचे ला बाधक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केली आहे व सदरील भाषण हे आरोपीने दंगली घडवून दहशत माजविण्याचा उद्देशाने हेतुपुरस्कर सदरील भाषणांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारित केलेल्या आहेत तसेच एक आक्षेपार्ह मजकूर यांचे पत्र पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिले आहे, या असामाजिक कामासाठी दंगली घडविण्याचा कृत्यासाठी जगविख्यात राजे सबंध बहुजन समाजाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर करून महापुरुषांच्या नावाची बदनामी केली आहे म्हणून आरोपी मिलिंद रमाकांत एकबोटे रा. ११७०/३३ , श्री गणेश मंदिरामागे शिवाजीनगर पुणे यांच्या विरुद्ध मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतीश काळे यांनी दिली. त्यांना कायदेशीर मदत ॲड  दीप्ती काळे, ॲड   स्वप्नील गिरमे, ॲड  सुरज जाधव, ॲड  दीपक गायकवाड यांनी केली. तसेच सतीश गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपाई(आय), आय.टी.शेख, अध्यक्ष, पुणे जिल्हा, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, अपना  वतन   संघटना चे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख ,साबीर भाई सय्यद, अध्यक्ष, पुणे शहर, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, अभिमन्यू सूर्यवंशी,अध्यक्ष, क्रीडा विभाग,महाराष्ट्र,रिपाई(आय), बापूसाहेब भोसले (अध्यक्ष - दलित पॅन्थर ऑफ इंडिया),विजय जगताप (अध्यक्ष - मास मुमेंट),सलीम  शेख , अध्यक्ष न्यू तिरंगा फौंडेशन, जमीर  मोमीन , नूरानी  फौंडेशन  अमजद  भाई  शेख , , मूलनिवासी मुस्लिम  मंच , गुलटेकडी  जनजागृती समिती, भारतीय  एकता महामोर्चा  अध्यक्ष अल्ताफ  भाई  सय्यद कोंढवा पोलिस स्टेशनला उपस्थित होते.

तसेच या ठिकाणी मिलिंद एकबोटे वर मोका कायद्या अंतर्गत कार्येवाही करण्याची मागणी करण्यात आली तरी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मा. सरदार पाटील साहेबानी मोका कायद्या अंतर्गत कार्येवाहिचे आश्वासन दिले. जर नेणाऱ्या ८ दिवसात जर आरोपी वर मोक्या ची कार्येवाही नाही झाली तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी :-

मा. सतीश काळे , जिल्हा उपाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड 

मो. ९८८१०३०००७


मा. सिद्दीकभाई शेख ,

संस्थापक अध्यक्ष ,अपना वतन संघटना ,

मो. ९६६५४८४७८६

Post a comment

0 Comments