जातीय तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त वक्त्यव्य केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे वर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलपुणे :   मिलिंद एकबोटे यांच्यावर जातीय तेढ निर्माण होईल असे  वादग्रस्त वक्त्यव्य केल्या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी कोंढवा पोलिस स्‍टेशनमध्ये मिलिंद रमाकांत एकबोटे (समस्‍त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष) यांनी जाणीवपुवर्क व हेतु पुरस्करपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्य हानी आणी वित्त हानी करण्याच्या उददेशाने व हेतुने लोकांना एकत्र संघटीत केले. गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछुट, बेताल वक्तव्य करुन एका विशिष्‍ठ धर्माविरुध्द बदनामी केली. सदरील भाषणाचे चित्रिकरण करुन ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारीत केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्‍याची माहिती ॲड तोसिफ शेख यांनी दिली.

भीमा कोरेगाव प्रकरणी एकबोटेंवर गुन्हा दाखल झाला होता. आता त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोंढव्यामध्ये हज हाऊस बनवण्याचे काम पुणे महापालिकेने सुरू केले आहे. या वरून एकबोटे यांनी महापालिकेवर टीका केली आहे.

Post a comment

0 Comments