विजबिल वसूलीबाबत सौम्य धोरण ठेवा अन्यथा आंदोलन हुपरी मनसेचे महावितरणला निवेदनहुपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी

कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. कोरोना महामारीने सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. असे असताना महावितरणकडून ग्राहकांना विज कनेक्शन कट करणे, दमदाटी करणे असे प्रकार होत आहेत.

यापुढे अल्पभूधारक, गोरगरिब, कामगार यांचे विजबिल माफ करावे. सर्व ग्राहकांना हप्त्याने विजबिल जमा करणेची सवलत द्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणेत येईल असे निवेदन हुपरी महावितरण कार्यालयास देणेत आले.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष, नगरसेवक दौलतराव पाटील, शहराध्यक्ष गणेश मालवेकर, सचिन इंगवले, राहूल हजारे, नागेश कौंदाडे, उमाजी पाटील, महादेव पाटील, पद्माकर चौगुले, प्रसाद देसाई, सुनिल धोंगडे, प्रशांत पाटील (गोट्या) व माजी नगरसेवक सुदर्शन खाडे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments