इचलकरंजी शहरातील पत्रकारांना कोव्हिड -१९ ची लस देणे बाबत नगराध्यक्षा अलका स्वामी यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी   इचलकरंजी : . इचलकरंजी शहरातील पत्रकारांना कोव्हिड -१९ ची लस देणे बाबत  नगराध्यक्षा अलका स्वामी यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी केली आहे.

  संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य त्याच बरोबर इचलकरंजीशहरात गेल्या वर्षां कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता.त्यावेळी नगरपरिषदेस शहरातील पत्रकारांनी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता नगरपरिषद प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मोलाचे सहकार्य केले होते. यामध्ये वृत्तपत्रा द्वारे कोरोना विषयक माहिती प्रसिद्ध करणे, नगर परिषदेच्या वतीने करणेत येणाऱ्या विविध प्रकारच्या सुचना / निवेदन /आवाहन इ. प्रसिद्ध करणे, त्याचबरोबरीने  शहरातील नागरिकांची जनजागृती आणि प्रबोधनाचे अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे कार्य केले आहे.

 सध्या सर्वत्र कोव्हिड १९ ची लस देणेचे कामयुद्ध पातळीवर सुरू आहे. याच अनुषंगाने  इचलकरंजी शहरातील सर्व पत्रकारांना कोव्हिड १९ ची लस देणेकामी नगराध्यक्षा  अलका स्वामी यांनी संबंधित विभागास आदेश होणे कामी मा.जिल्हाधिकारीसो  यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.


    


Post a comment

0 Comments