लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण , पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी.






पुणे :  एखादी गोष्ट दुसऱ्याला व्यवस्थित समजून सांगणे, व ती करण्यास सांगणे, पण आपण ते न करता दुसरंच करणे. म्हणजेच " लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण " असाच प्रकार मंगळवारी एका पत्रकार परिषदेत घडला . कोरोनाचा फैलाव  नये म्हणून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  जीव तोडून सांगत असताना काही नागरिक त्याचे पालन करताना आढळत नाहीत ,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु एका जबाबदार पदावर असणारे *पुणे शहराचे पोलीस आयुक्तच मास्क न घालता वावरतात तेंव्हा त्याना मोकळीक व सूट दिली जाते. त्यामुळे कायदा केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच का ?* असा प्रश्न जनता विचारात आहे. 

          मंगळवारी पत्रकार परिषदेत पुणे शहराचे *पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर वरिष्ठ अधिकारी मास्क न वापरता वावरताना आढळून आले आहेत.याबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मास्क न वापरल्याने सामान्य नागरिकांना दंड आकारला जातो तसा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून दंड वसूल करावा.* अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,पुणे जिल्ह्धिकारी राजेश देशमुख ,पुणे महानगरपालिकेचे 

आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे कि,            

           महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोनाचे स्ट्रेन आढळल्याने तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून कोरोनाचा प्रचार रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिले होते . तसेच नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आव्हान केले होते. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन चे संकेत दिले होते. त्यामुळे *पुणे जिल्हाधिकारी मा. राजेश देशमुख यांनी दि. २१/०२/२०२१ रोजी कोविड -१९ विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना च्या अनुषंगाने प्रभावी अंलबजावणीचे आदेश पारित केले होते. तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. विक्रम कुमार यांनीही कोरोना बाबत नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. पुणे शहरात सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स, मॉल्स आणि दुकानांवर पालिकेच्या पथकांकडून धडक कारवाई केली जात आहे.* आतापर्यंत सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या 568 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने ८ दिवसांत ३ लाख  रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.  सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या आस्थापनांकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.

▪️▪️▪️

 याशिवाय, *विनामास्क फिरणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. आतापर्यंत शहरात 2 लाख 53 हजार विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.अशा परिस्थितीत सर्वाना कोविड बाबतच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु दि. २ मार्च २०२१ रोजी पुणे पोलीस आयुक्तलयात लष्करच्या पेपर फुटीप्रकरणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. परंतु पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व त्यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मास्क घातलेला न्हवता .* अशा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून मास्क न घेतल्यास १००० रुपयाचा दंड वसूल केला जातो. त्याचप्रमाणे *सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडून  १००० रुपये  दंड वसूल करण्यात यावा. त्या दंडाची पावती सार्वजनिक करावी व  अपना वतन संघटनेला कार्यलयीन पत्यावर पाठवावी .*


सोबत :- पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी विनामास्क वावरताना दैनिक पुढारी मधील फोटो ( दि. ३ मार्च २०२१)*


आपला विश्वासू ,

*मा. सिद्दीकभाई शेख ,*

*संस्थपाक ,अध्यक्ष , अपना वतन संघटना*

*मो. ९६६५४८४७८६*

Post a Comment

Previous Post Next Post